Sonali Phogat Case : सोनाली फोगटसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चा सांगवानचा दावा

पोलिसांनी जप्त केल्या सोनाली फोगट यांच्या डायऱ्या
Sonali Phogat Murder case
Sonali Phogat Murder caseDainik Gomantak

Sonali Phogat Case : भाजप नेत्या सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी हरियाणातील हिसारमध्ये गेलेल्या गोवा पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सोनाली यांच्या यापूर्वीच्या तीन महत्त्वपूर्ण डायऱ्या जप्त केल्या आहेत. तसेच त्यांचे लॉकरही सिल केले. दुसरीकडे आपण सोनाली फोगट यांच्या समवेत ‘लिव इन रिलेशनशिप’ मध्ये राहत होतो अशी माहिती या प्रकरणातील संशयित सुधीर सांगवान यांनी पोलिसांना दिली.

भाजपच्या नेत्या सोनाली फोगट खून प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यांच्या मृत्यूच्या दिवशी सोनाली यांना पीए सुधीर पाल सांगवान व सुखविंदर सिंग या दोघांनी तीन वेळा ड्रग्स दिले होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सोनाली यांना 22 ऑगस्टच्या रात्री तीन वेळेला एमडीएमए हे अमली पदार्थ संशयितांनी संबंधितांनी दिले होते. त्या राहत असलेल्या ग्रँड लियोनी या रिसॉर्टमध्ये एकदा आणि कर्लिस बारमध्ये दोन वेळेला संशयित सांगवान आणि सुखविंदर सिंग यांनी हे ड्रग्ज दिले. त्यावेळी संशयितांनीही ड्रग्स घेतले होते. मात्र, त्यांची मात्रा खूपच कमी होती.

Sonali Phogat Murder case
Sonali Phogat Case : तपासाला गती; पोलिसांना सापडले धागेदोरे

सोनाली फोगट खून प्रकरणाशी संबंधीत ड्रग्स प्रकरणातील कर्लिस बारचा मालक संशयित एडविन नूनीस, संशयितांना ड्रग्सचा पुरवठा करणारा हॉटेल ग्रॅण्ड लिओनीचा रूमबॉय दत्तप्रसाद गावकर व त्याला ड्रग्जचा पुरवठा करणारा रामदास उर्फ रामा मांद्रेकर यांना म्हापसा न्यायालयाने काल शुक्रवारी सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सांगवान व सुखविंदर यांना ड्रग्सचा पुरवठा केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गावकर व मांद्रेकर यांना अटक केली होती. तर कर्लिस क्लबमध्ये संशयितांनी लपविलेला ड्रग्स सापडल्याने एडविन अटकेत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com