MOC Shipyards, Sancoale,
MOC Shipyards, Sancoale,Dainik Gomantak

MOC Shipyards मध्ये प्रथमच कंटेनर मालवाहू जहाजाची बांधणी; धार्मिक विधी करुन ठेवलंय जहाजाचे 'हे' नाव

हे जहाज पूर्व आफ्रिकेच्या समुद्रातील छोट्या बेटावर मालवाहू सेवा बजावणार आहे
Published on

MOC Shipyards सांकवाळ-झरी येथील ‘एमवोसी’ ऑस्ट्रेलियन आंतरराष्ट्रीय शिपयार्डमध्ये प्रथमच कंटेनर मालवाहू जहाजाची बांधणी केली आहे. हे मालवाहू जहाज सेचॉस्प पूर्व आफ्रिकेमध्ये समुद्रमार्गे रवाना होणार आहे.

तसेच एमवोसी शिपयार्डमध्ये पुढे आणखीन २० मोठी कंटेनर मालवाहू (फेरी) जहाजे बांधण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती एमवोसी ऑस्ट्रेलियन आंतरराष्ट्रीय शिपयार्डचे संचालक बॉस्को डिसिल्वा यांनी दिली.

MOC Shipyards, Sancoale,
Pernem Local Protest: पेडणे स्थानकावर बस थांबवण्यासाठी नागरिकांचे उपोषण; उपजिल्हाधिकारी म्हणाले...

सांकवाळ येथील ‘एमवोसी’ ऑस्ट्रेलियन आंतरराष्ट्रीय शिपयार्डमध्ये कंटेनर मालवाहू जहाजाचे प्रक्षेपण संचालक बॉस्को डिसिल्वा, रॉब भोरा (ऑस्ट्रेलिया) व इतर अधिकारी कामगारांच्या उपस्थितीत झाले.

जहाजाचे झुआरी नदीत प्रक्षेपण करण्यापूर्वी विविध प्रकारची धार्मिक विधी करण्यात आली. कंटेनर जहाजाचे ‘पी चांन्टीअस पोर्ट विक्टोरिया फेरी’ असे नामकरण करण्यात आले आहे. हे जहाज पूर्व आफ्रिकेच्या समुद्रातील छोट्या बेटावर मालवाहू सेवा बजावणार असल्याची माहिती डिसिल्वा व भोरा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com