Goa: दामोदर संगीत विद्यालयात चंद्रनमस्कारद्वारे गुरुला वंदन

मडगाव येथील श्री दामोदर विद्याभुवन येथील श्री दामोदर संगीत विद्यालाने ( Music School) गुरुपौर्णिमेनिमित्त योग व नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले.
- श्री दामोदर संगीत विद्यालयातर्फे आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात चंद्रनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखविताना विद्यार्थी.
- श्री दामोदर संगीत विद्यालयातर्फे आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात चंद्रनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखविताना विद्यार्थी.Dainik Gomanatk
Published on
Updated on

फातोर्डा: मडगाव येथील श्री दामोदर विद्याभुवन येथील श्री दामोदर संगीत विद्यालाने गुरुपौर्णिमेनिमित्त योग व नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले. शनिवारी ऑनलाईन (Online) व प्रत्यक्ष रितीने आयोजित केलेल्या कार्क्रमात सकाळच्या सत्रात योग विद्यार्थ्यांनी शिक्षक गौरव व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रनमस्कार प्रात्यक्षिकाद्वारे गुरुला वंदन केले. सर्वांना सुर्यनमस्कार माहित आहे. चंद्रनमस्कार याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व असल्याचे गौरव व्यास यांनी सांगितले.

- श्री दामोदर संगीत विद्यालयातर्फे आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात चंद्रनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखविताना विद्यार्थी.
Goa Covid-19: काणकोणात रोगप्रतिकारक शक्ती तपासण्याचे अभियान सुरू

या कार्यक्रमात निलय नाईक दलाल, प्रफुल्ल घाडगे, स्विटी घाडगे, ऋथिकियन सपना सारंग, कल्पिता नाईक, गुरुदास कदम, शमा कदम, सुचिता लोलयेकर, शीतर प्रताप ढेरे, जानकी मुळे, आसावरी सत्यजीत, दिपाली डिकॉस्ता, श्वेता नाईक दलाल यांनी भाग घेतला.

- श्री दामोदर संगीत विद्यालयातर्फे आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात चंद्रनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखविताना विद्यार्थी.
Goa Flood: भिरोंड्यातील नागरिकांचा मदतीसाठी आक्रोश

संध्याकाळच्या सत्रात नृत्य विद्यार्थ्यांनी त्याना शिकवलेली नृत्ये सादर करतील. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची परिक्षा जवळ पोहोचली असल्याने या कार्यक्रमाद्वारे त्यांना सराव करण्याची संधी प्राप्त झाल्याचे व्यास यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com