सासष्टीत अजूनही प्रतीक्षा; शेतकरी चिंतेत, अनियमित पावसामुळे भातलागवडीवर परिणाम होण्याची भीती

Goa Salcete Paddy Cultivation: यंदा पावसाने ओढ दिल्याने सासष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मध्यंतरी झालेल्या पावसाचा लाभ घेत अनेक शेतकऱ्यांनी पेरणी व भातलागवड केली.
Salcete Rain
Salcete RainDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: यंदा पावसाने ओढ दिल्याने सासष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मध्यंतरी झालेल्या पावसाचा लाभ घेत अनेक शेतकऱ्यांनी पेरणी व भातलागवड केली. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पाऊस अनियमित होत असल्याने भातपिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

साधारणपणे जूनमध्ये सुरू होणारी शेतीची कामे जुलैपर्यंत वेगाने पूर्ण होत असतात. यंदा मात्र पावसाने दडी मारल्याने पेरणी आणि लागवड उशिरा झाली. सखल भागातील तसेच जलस्त्रोतांजवळील शेतांमध्ये पाणी उपलब्ध असल्याने तेथील भातपिकाला सध्या धोका नसला, तरी उंच भागांतील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने तेथील शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. काही शेतकऱ्यांनी अद्यापही भातलागवड सुरू केलेली नाही.

कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले की, सखल भागातील शेतांमध्ये पाणी असल्यामुळे तेथील भातलागवड सुरळीत होईल. मात्र, उंच भागांतील शेतांना पावसाची नितांत गरज आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी कृषी संचालनालय आणि जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे.

Salcete Rain
Goa Section 39A: कलम '39-अ' रद्द करा, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन; 'टीसीपी'ला 'इनफ्‌'चा अल्टिमेटम!

दरम्यान, शेतकरी वालेंतीन रॉड्रिग्स यांनी सांगितले की, आपण शेतकऱ्यांना शेती लागवडीसाठी यंत्रसामग्री व सेवा उपलब्ध करून देतो. मात्र, यापुढेही पुरेसा पाऊस झाला नाही, तर अनेक शेतांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Salcete Rain
Goa Heavy Rain: पावसाच्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला, पण सत्तरीत ढगफुटीसदृश पावसामुळे रस्ते जलमय, जनजीवन ठप्प

या पार्श्वभूमीवर कृषी खात्याने शेतकऱ्यांना सावधगिरीच्या सूचना जारी केल्या आहेत. पिकांवरील ताण कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिथे शक्य असेल तेथे संरक्षित सिंचनाचा वापर करावा, लागवड केलेल्या शेतात उथळ पाण्याची पातळी कायम ठेवावी, तसेच पुरेसा पाऊस किंवा सिंचनाची व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत प्रत्यारोपण पुढे ढकलावे, असा सल्ला कृषी खात्याने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com