Salaulim Dam: जखमेवर मीठ! तिरंगा घेऊन उत्साह साजरा करायच्या दिवशी 'काळे झेंडे’ दाखवणं हे दुर्देव- गावकर

आनंद गावकर- धरणग्रस्तांना डावलून साळावली धरणावर शेतकऱ्यांचा गौरव का?
Salaulim Dam
Salaulim DamDainik Gomantak
Published on
Updated on

Salaulim Dam: साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा सरकारकडून प्रयत्न होत असून पंधरा ऑगस्ट रोजी साळावली धरणावर स्वातंत्र्यदिनानिमित्त जलसंपदा खात्याने धरणग्रस्तांना सोडून इतर शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

त्यामुळे संतप्त धरणग्रस्तांतर्फे या प्रकाराचा निषेध करण्यात येत असून कार्यक्रमप्रसंगी मंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याची माहिती ॲड. आनंद गावकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. यावेळी संतोष गावकर महेश गावकर, वड्डो कालेकर, सुनील गावकर, बाबी गावकर इतर धरणग्रस्त उपस्थित होते.

Salaulim Dam
Banastarim Bridge Accident: लोकांना पोलिसांचा धाक उरला नाही; दिलीप प्रभुदेसाई

आनंद गावकर पुढे म्हणाले, गेल्या सत्तेचाळीस वर्षात धरणग्रस्तांना न्याय तर दिलाच नाही. उलट आता धरणग्रस्त सोडून इतर शेतकऱ्यांचा सन्मान केला जात आहे, तोसुद्धा साळावली परिसरात. आम्ही शेतकऱ्यांच्या सन्मानांविरोधात नसून सरकारच्या कृती विरुद्ध आहोत.

आम्हाला न्याय देण्याची मागणी करीत असताना आमच्या मागण्याकडे सहानुभूतीपूर्वक विचार न करता, शासनातर्फे वेगळाच उपक्रम राबविला जात आहे.

ज्या दिवशी तिरंगा हातात घेऊन उत्साह साजरा करायचा, त्या दिवशी खितपत पडलेल्या मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘काळे झेंडे’ घ्यावे लागणार आहेत, हा आमचा नाईलाज असल्याचेही गावकर यांनी सांगिते.

Salaulim Dam
Drink and Drive: कळंगुट वाहतूक पोलीस ॲक्शन मोडमध्ये! मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्या 5 जणांवर कारवाई

गेल्या सत्तेचाळीस वर्षात अनेक सरकारे बदलली, आमदारही आले आणि गेले. फक्त आश्‍वासनाशिवाय काहीच दिले नाही. त्यामुळे धरणग्रस्तांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्या सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाहीत. आता सहनशीलतेचा अंत झाला असून दुसरा पर्याय राहिलेला नाही.

आदिवासी समाजाच्या नेत्यांनी आदिवासी हक्क कोणते, याची माहिती देण्यासाठी उपक्रम राबविण्यापेक्षा ते हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्यास अधिक चांगले होईल, पण आजपर्यंत कोणत्याही आदिवासी नेत्याने धरणग्रस्तांना आपली सहानुभूती दाखविली नाही, असे आनंद गावकर सांगितले.

Salaulim Dam
Turmeric Production In Goa: हळदीला सुवर्णकाळ! राज्यात उत्पादन वाढणार, शास्त्रज्ञांद्वारे प्रयोग सुरु

कार्यक्रम रद्द करा!

जलसंपदा खात्यातर्फे साळावली धरणाचे पाणी वापरून ज्यांनी चांगली शेती केली, त्यांचा सन्मान करू पाहत आहे आणि तोसुद्धा साळावली धरण परिसरात. हा कार्यक्रम साळावली परिसरात न करता अन्य कुठेही करण्यास आमचा मुळीच विरोध नसून सरकारने तो रद्द न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून काळे झेंडे दाखविणार आहोत, असे उपस्थित धरणगस्तांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com