Banastarim Bridge Accident: लोकांना पोलिसांचा धाक उरला नाही; दिलीप प्रभुदेसाई

बाणस्तारी अपघातावर मान्यवरांचे मत; सामाजिक भान गरजेचे
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Banastarim Bridge Accident: तुम्ही परराज्यात कोठेही गेलात तर तुम्हाला जाणवेल की त्या राज्यात पोलिसांना पाहिले की भीती वाटते, त्यांचा एक प्रकारचा धाक असतो; परंतु गोव्यात तसे होताना दिसत नाही. हे खरेतर गोवा पोलिसांचे अपयश आहे, असे मत गोवा फॉरवर्डचे नेते दिलीप प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले. बाणस्तारी अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर ‘गोमन्तक टीव्ही’वर संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

Goa Police
Bhausaheb Bandodkar बांदोडकर समाधीस्थळ नूतनीकरणाला अखेर मुहूर्त!

बाणस्तारी पुलावर जो अपघात घडला त्याच्या जखमा अजून ताज्या आहेत; परंतु दुर्दैवाने आपण काही दिवसांत ही घटना विसरून जाऊ.प्रत्येकाने असा विचार करणे गरजेचे आहे की जर का मी या अपघाताचा भाग असतो तर माझे काय झाले असते? प्रत्येकाला आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव असणे गरजेचे आहे, असेही प्रभुदेसाई म्हणाले.

या चर्चेत प्रा. मनोज कामत तसेच डॉ. बबिता प्रभुदेसाई यांनी सहभाग घेतला होता. पाश्‍चात्य देशात ज्यावेळी पार्टी केली जाते, त्यावेळी जी व्यक्ती वाहन चालवणार आहे, ती मद्यपान करत नाही. परंतु आपल्या देशात तसे घडताना दिसत नाही, ही शोकांतिका आहे. पाश्‍चात्य संस्कृतीचा अवलंब करताना ही गोष्टदेखील ध्यानात घेणे गरजेचे आहे.

मद्यामुळे येतो अतिआत्मविश्‍वास!

आजकाल मद्यपान हे एक श्रीमंतीचे लक्षण बनले आहे. परंतु एक डॉक्टर म्हणून माझे मत आहे की, जेव्हा एखादा व्यक्ती ५२ मिलीपर्यंत मद्याचे सेवन करते, त्यावेळी त्याला एकप्रकारच्या आनंदाची अनुभूती होते. परंतु त्याहून अधिक मद्यसेवन केल्यास अतिआत्मविश्‍वास येतो. त्यामुळे जर एखादी व्यक्ती ५२ मिलीहून अधिक मद्यपान करून वाहन चालवत असेल तर, बहुतांशी अपघात हे अतिआत्मविश्‍वासामुळे वाहनावरील ताबा गेल्याने होतात, हे दिसून आले आहे. बाणस्तारी अपघातही याच कारणामुळे झाला यात शंका नाही, असे डॉ. बबिता प्रभुदेसाई यांनी सांगितले.

Goa Police
Flag Hoisting मंत्र्यांसाठी ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळेत बदल!

गोव्यात मद्य पाण्यासारखे हे चित्र पुसायला हवे!

बाणस्तारी पुलावर जी घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आहे. देशभरात मद्यपानामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. गोव्यात मद्य पाण्यासारखे वाहते, अशाप्रकारचे एक चित्र निर्माण करण्यात आले आहे. ते आम्हाला पुसून टाकायला हवे. प्रशासनाला दोष देतानाच आपण सामाजिक भान राखणे गरजेचे आहे. वाहन चालविताना आपण इतरांच्या जीवाची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत प्रा. मनोज कामत यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com