Drink and Drive: कळंगुट वाहतूक पोलीस ॲक्शन मोडमध्ये! मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्या 5 जणांवर कारवाई

राज्यात सर्व ठिकाणी आता रात्रीच्या वेळी मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे
Drink and Drive
Drink and Drive Dainik Gomantak

Goa Traffic Police: काही दिवसांपूर्वी बाणस्तारी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर वाहतूक पोलीस पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्यात सर्व ठिकाणी आता रात्रीच्या वेळी मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. यातच काल कळंगुट पोलिसांनी यामध्ये 5 जणांवर कारवाई केली आहे.

Drink and Drive
Banastarim Bridge Accident: लोकांना पोलिसांचा धाक उरला नाही; दिलीप प्रभुदेसाई

कळंगुट वाहतूक शाखेतर्फे काल डॉल्फिन सर्कलजवळ विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये पोलिसांनी वाहनचालकांची तपासणी केली. मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्या 5 जणांवर मोटरवाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'बार'बाहेर पोलिसांची पाळत!

काही चालक मद्यप्राशन करून वाहने चालवत असल्याने वाहतूक पोलिसांनी नवी युक्ती शोधून काढली आहे. विशेषत: गर्दी असलेल्या मद्यालयातून व्यक्ती बाहेर येते आणि वाहन घेऊन रस्त्यावर येते, त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस अशा मद्यालयांबाहेर तैनात करण्याचे ठरविले आहे.

मद्यचाचणी : 364 जणांवर कारवाई

यापुढे मद्यालयातून बाहेर येणारी व्यक्ती जर वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यावर नजर ठेवण्यासह त्यांची मद्य चाचणी करून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक पोलिस विभागाने जारी केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com