Electricity Issue In Goa: भूमिगत वीजवाहिनी घातली, विद्युत उपकेंद्र सुरू झाले पण अजूनही साळवासीय अंधारातच

अपुरा कर्मचारी वर्ग : सातत्याने वीजपुरवठा खंडित; उपाययोजनेची मागणी
Electricity Issue
Electricity IssueGomantak Digital Team
Published on
Updated on

Electricity Issue In Goa डिचोली मतदारसंघातील साळ येथील वीज उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा बेभरवशाचा झालेला आहे. गेल्या 81 दिवसांत वीज खंडित झाली नाही, असा एकही दिवस गेलेला नाही.

17 मे पासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना आजपावेतो थांबलेल्या नाहीत. या ना त्या कारणामुळे, कधी दिवसा तर कधी रात्री कित्येक वेळा वीज खंडित होत असते.

साळ येथे नव्याने विद्युत उपकेंद्र सुरू झाले. भूमिगत वीजवाहिनीही घातली गेली, त्यामुळे येथील लोकांना वाटले होते की आता वीजपुरवठा सुरळीत होईल; पण यावर्षी वीज खंडित होण्याचे जेवढे प्रकार घडले तेवढे यापूर्वी कधीच घडलेले नाहीत. आता तर आसपासच्या लोकांचा या वीज उपकेंद्रावरील विश्वासच उडाला आहे.

दर महिन्याला येणाऱ्या विजबिलावेळी विजेचे दर मात्र वीज खाते वाढवतच असते; पण ग्राहकांना योग्य सुविधा देण्यात मात्र कमी पडले आहे, अशी खंत काही ग्राहकांनी बोलून दाखवली.

साळमध्ये सुरू झालेले वीज उपकेंद्र हे नावापुरतेच उभे आहे काय, असाही प्रश्न पडतो. योग्य संख्येने येथे वीज कर्मचारी नाहीत. फक्त सहाजण आहेत. रात्री-अपरात्री वीज खंडित झाल्यास त्यांना डिचोलीहून कुमक बोलवावी लागते, तोपर्यंत साळवासीयांना अंधारात राहावे लागते.

अस्नोडा येथून येणाऱ्या वीजकेबल भूमिगत कराव्यात. जेणेकरून त्यातून सातत्य राहील, वीजपुरवठा सुरळीत होईल व कोणतीही वीज खंडित होण्याची घटना घडल्यास कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागणार नाही.

तरी वीज खात्याने यावर थोडा विचार करून बनावटी केबल न घेता योग्य केबलचा वापर करावा, अशी ग्राहकांची विनंती आहे.

Electricity Issue
Jayesh Chodankar Case: संशयित आरोपी प्रितेश, कृपेशचा जामीन अर्ज गोवा खंडपीठाने फेटाळला; नव्याने अर्ज करण्याची मुभा

प्रत्येक दिवशी बिघाड

साळ येथील विद्युत उपकेंद्र सुरू होण्याअगोदर साळला डिचोली येथून वीजपुरवठा व्हायचा. डिचोली येथे कोणताही बिघाड झाल्यास तेथे दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत केला जात असे.

आता मात्र थिवी येथून ३३ केव्ही केबलद्वारे वीजपुरवठा केला जात असून अस्नोडा येथे वेगळी जोडणी करून डिचोली व साळ येथे ११ केव्ही केबलने वीजपुरवठा केला जातो, त्यामुळे प्रत्येक दिवशी अस्नोडा येथे जोडलेल्या केबलमध्ये बिघाड होतो.

Electricity Issue
Rise In Vegetable Price: पालेभाज्या कडाडल्या! टोमॅटो दर ‘जैसे थे’

वीजजोडणी खांबांवरून

संपूर्ण वीजवाहिन्यांची जोडणी ही खांबांवरून केलेली आहे. तसेच ती कॅनलच्या मार्गाने रानावनांतून येते, त्यामुळे कुठे काय घडले ते कर्मचाऱ्यांना शोधणेही खूप कठीण होते.

अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे येथील कर्मचारीही विविध प्रकाराने वीज सुरळीत करण्याकरिता धडपडत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com