Goa: ‘खलाशांना मिळणार कायमस्वरूपी पेन्शन’

Goa: आमदार चर्चिल आलेमाव यांची माहिती
Goa: MLA Churchill Alemao speaking in a press conference at Margao. Frank Viegas also seen.
Goa: MLA Churchill Alemao speaking in a press conference at Margao. Frank Viegas also seen.Dainik Gomantak

सासष्टी : खलाशी (Sailor) तसेच खलाशांच्या विधवा (Sailors widow) महिलांसाठी सरकारने (Goa Government) पेन्शन योजना (Pention Scheem) फक्त सहा महिन्यांसाठी पुन्हा सुरू केल्याने यासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्याकडे चर्चा करण्यात आली आहे. ही योजना कायमस्वरूपी लागू करण्याची मागणी केली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी पेन्शन योजना कायमस्वरूपी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, अशी माहिती बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (MLA Charchil Alemao) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Goa: MLA Churchill Alemao speaking in a press conference at Margao. Frank Viegas also seen.
‘हे सरकार खरच गोमंतकीयांच्या हिताचे रक्षण करणारे आहे का?’

गोव्यातील सर्व खलाशी वर्गाला वर्षाला दीड कोटी रुपये पेन्शन देण्यासाठी लागणार असून या खलाशांना योजनेअंतर्गत मिळणारे पेन्शन कायमस्वरूपी करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. खलाशांना गेल्या दोन वर्षांपासून थकबाकी मिळाली नसून तीही मिळवून देण्यात येणार आहे, असे आलेमाव यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खलाशांच्या भल्यासाठी पेन्शन योजना सुरू केली होती, पण, नंतर त्यांच्या निधनानंचक ही पेन्शन मिळणे बंद झाले. ऑक्टोबर २०१९ ते २०२१ पर्यंत खलाशांना पेन्शनच्या योजनेचे पैसे मिळाले नसून सरकार दरबारी याची माहिती दिल्यावर सरकारने फक्त सहा महिन्यांसाठी ही पेन्शन योजना पुन्हा सुरू करून थकबाकी देण्याचे आश्वासन दिले होते. हा मुद्दा चर्चिल आलेमाव यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी विधानसभेत यावर आवाज उठविला, असे अखिल गोवा खलाशी संघटनेचे अध्यक्ष फ्रेंक व्हिएगस यांनी सांगितले. यासंबंधी मुख्यमंत्र्यांशीही त्यांनी चर्चा केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com