Mainapi & Savari Waterfalls: खूशखबर! नेत्रावळीतील मैनापी, सावरी धबधबे पर्यटकांसाठी खुले; सफारी कार सेवा सुरु

Goa Safari Car Service: नेत्रावळीतील मैनापी आणि सावरी धबधबे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. धबधब्यावर जाण्यासाठी खास सफारी कार सेवा सुरु करण्यात आली आहे.
Mainapi & Savari Waterfalls: खूशखबर! नेत्रावळीतील मैनापी, सावरी धबधबे पर्यटकांसाठी खुले; सफारी कार सेवा सुरु
Deviya RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Waterfall Latest Update

राज्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. देश-विदेशातील पर्यटकांची गोव्यात तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. नेत्रावळीतील मैनापी आणि सावरी धबधबे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. धबधब्यावर जाण्यासाठी खास सफारी कार सेवा सुरु करण्यात आली आहे. सध्या दोन तर भविष्यात आणखीन 8 कार्स उपलब्ध होणार आहेत. सफारी सेवेच्या माध्यमातून स्थानिकांच्या रोजगाराला चालना मिळेल, अशी माहिती वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. देविया राणे यांनी यावेळी दिली.

पावसाळ्यात बंदी

दरम्यान, पावसाळ्यात धबधबे आणि नदीवर जाण्यास वन खात्याने बंदी घातली होती. राज्यात वाढत्या दुर्घटना लक्षात घेता वन खात्याकडून हा आदेश जारी करण्यात आला होता. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याला (Goa) अशाप्रकारची बंदी मारक ठरु शकते असे वक्तव्य पर्यटनमंत्र्यांनी केल्यानंतर राज्यातील कमी धोकादायक क्षेणीतील धबधबे सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. राज्यात एकूण 28 धबधबे असून, त्यांची कमी धोकादायक, मध्यम आणि उच्च धोकादायक अशा तीन श्रेणीत वर्गीकरण करण्यात आली आहे. यापैकी कमी धोकादायक श्रेणीतील धबधबे प्रखर दबावानंतर सर्वांसाठी खुले करण्यात आले होते.

Mainapi & Savari Waterfalls: खूशखबर! नेत्रावळीतील मैनापी, सावरी धबधबे पर्यटकांसाठी खुले; सफारी कार सेवा सुरु
Ban on Goa Waterfall: पाणवठे, धबधब्यांवर हुल्लडबाजी रोखा! बंदी कालावधीनंतर वनमंत्री कोणता निर्णय घेणार?

मृत्यू

गेल्यावर्षी धबधब्यावर बुडून मृत्यू होणाऱ्यांची संख्येत वाढ झाली होती. त्यानंतर सरकारने राज्यातील कमी धोकादायक धबधब्यांची यादी जारी केली होती. राज्यातील कमी धोकादायक धबधबे सर्वांसाठी खुले असतील असे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com