Vegetables Rate: गोवा राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी लागवड केलेली लालभाजी, मुळे, काही प्रमाणात भेंडी, गवार बाजारात दाखल झाली असून नागरिकांचा मोठ्या प्रमाणात या भाज्या खरेदीकडे कल आहे. कारण या ताज्या भाज्या मिळतात तसेच दरदेखील इतर भाज्यांच्या तुलनेत समान आहेत.
राज्यात कांदे, बटाटे तसेच इतर भाजीपालादेखील अजून महागच आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून टोमॅटोच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. टोमॅटो 50 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात होते. आता 30 रुपये प्रतिकिलोने विकले जात आहेत. मिरची अजूनही तिखटच आहे. कारण गेल्या वर्षी 40 ते 50 रुपये प्रतिकिलोने मिळणाऱ्या हिरव्या मिरचीने यंदा शंभरी गाठली आहे. 40 रुपये जुडी मिळणाऱ्या कोथिंबिरीचे भावदेखील 10 रुपयांनी उतरले आहेत.
कंदमुळे, फळांना अधिक मागणी
राज्यात आता व्रतवैकल्याचे दिवस सुरू असल्याने चिनी, कणगी, करांदे, तसेच इतर कंदमुळे व फळांनादेखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. केळी 60 ते 80 रुपये प्रतिडझन दराने विकले जात असून सफरचंद, डाळिंब, चिकू, मोसंबी, द्राक्ष यांचे दरदेखील वाढले आहेत.
दर प्रतिकिलो (रुपयांत)
कांदा....40
बटाटा....40
टोमॅटो....30
गवार....60
कोबी....40
फ्लॉवर....40
गाजर....60-80
भेंडी....70-80
शिमला मिरची... 80-
हिरवी मिरची....100
पालेभाजी प्रतिजुडी (रुपयांत)
मेथी....20
लालभाजी....20
कांदापात....20
मुळा....20
पालक....20
शेपू....10
पुदिना....10
कोथिंबीर....30 रु. एक जुडी
लिंबू ....5 रुपयांना 1
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.