Goa HSC Result : कमलेश्वर विद्यालयातून धनश्रीने पटकावला पहिला क्रमांक

कला शाखेत कु.धनश्री प्रकाश नाईक (Dhanashree Prakash Naik) ही विद्यार्थिनी 94.69 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली.
Dhanashree Prakash Naik
Dhanashree Prakash NaikDainik Gomantak

नुकत्याच जाहीर झालेल्या 12 वी बोर्डाच्या परीक्षेत कोरगाव येथील श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयातून (Kamaleshwar High School) कला शाखेत कु.धनश्री प्रकाश नाईक (Dhanashree Prakash Naik) ही विद्यार्थिनी 94.69 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. तर वाणीज्य शाखेत कु. साईश प्रकाश हरमलकर 92.66 टक्के गुण मिळवून प्रथम आला. याविध्यालयातून कला शाखेत 58 तर वाणिज्य शाखेत 45 विध्यार्थी उत्तीर्ण झाले.विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला.

कला शाखेत विशेष प्राविण्य श्रेणीत 12, प्रथम श्रेणीत 24 तर द्वितीय श्रेणीत 22 विध्यार्थी उत्तीर्ण झाले.वाणिज्य शाखेत विशेष प्राविण्य श्रेणीत 19 ,द्वितीय श्रेणीत 16 विध्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून कुमारी प्राची प्रशांत गावडे 89.33 टक्के मिळवून द्वितीय , कुमारी सायली संदीप कांबळी 89 टक्के तृतीय ,कुमारी श्रुती दयानंद गवंडी 88.50 टक्के चौथी, व कुमारी दुर्वा रामफोंडू गावस 86.33 टक्के मिळवून पाचवी आली.

Dhanashree Prakash Naik
Goa SSC Result : मोरजी विद्याप्रसारक हायस्कुलचा 100 टक्के निकाल

वाणिज्य शाखेत कुमार विष्मय उमेश गडेकर 87 टक्के द्वितीय,कुमार झिमु जानू बुटे 86.66 टक्के तृतीय ,कुमारी नेहा नारायण मावलणकर 86 टक्के चतुर्थ व कुमार स्वप्नील सचिन कवठणकर 85.15 टक्के मिळवून पाचवा आला. विद्यालयाने आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम. राखल्या बद्दल श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन श्री परशुराम गावडे,पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष मिलिंद तळकर प्राचार्य सुदन बर्वे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com