पश्चिम बगल रस्त्याचे काम स्थानिकांनी पुन्हा पाडले बंद..!

सुरावली येथे आज हे काम करण्याचा प्रयत्न केला होता...
Goa Road work stopped again by locals
Goa Road work stopped again by localsDainik Gomantak

मडगाव: (goa) स्थानिकांचा विरोध असतानाही पश्चिम बगल रस्त्यावर मातीचे भराव घालण्याचा केलेला प्रयत्न आज पुन्हा एकदा बंद पाडण्यात आला. सुरावली येथे आज हे काम करण्याचा प्रयत्न केला होता.

Goa Road work stopped again by locals
गोव्यात पार्टीचा प्लॅन करताय? 'हे' आहेत सर्वोत्कृष्ट नाइटक्लब

आज दुपारी माती भरून असलेले सुमारे 6 ट्रक या भागात आणण्यात आले होते. त्यापैकी दोन ट्रक माती खाली करण्यात आली. मात्र याचा सुगावा स्थानिकांना लागल्यावर त्यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी येऊन काम बंद केले.

या संबंधी माहिती देताना बेंजामिन फेर्नांडिस यांनी सांगितले, या भागात मातीचा भराव टाकून रस्ता उभारल्यास पावसात पूर येऊ शकतो, त्यासाठी हा रस्ता स्टिल्टवर उभारावा अशी आमची मागणी आहे. राष्ट्रीय हरित लवादानेही आमची मागणी मान्य केली आहे.

Goa Road work stopped again by locals
पहिली-आठवीच्या शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार: मुख्यमंत्री

असे असतानाही बळजबरीने हे काम चालू ठेवल्याने आम्ही ते बंद पाडले अशी माहिती दिली.

चार दिवसांपूर्वी स्थानिक आमदार विजय सरदेसाई यांनी हे काम बंद पाडले होते. या कामाचा आराखडा सादर करा आणि नंतरच काम सुरू करा अशी ताकीद दिली होती. त्यानंतर हे काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र मंगळवारी ते पुन्हा सुरू केल्याने स्थानिक खवळले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com