Goa: नानेरवाडा पेडणे येथील रस्त्याची धडा कोसळली

कोसळलेल्या रस्त्याची तातडीने नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी पाहणी केली व स्थानिक उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि सार्वजनिक बांधकाम रस्ता विभाग यांना कल्पना दिली.
नानेरवाडा पेडणे येथील रस्त्याची धडा कोसळली त्याची पाहणी करताना नगराध्यक्ष उषा नागवेकर
नानेरवाडा पेडणे येथील रस्त्याची धडा कोसळली त्याची पाहणी करताना नगराध्यक्ष उषा नागवेकर छाया निवृत्ती शिरोडकर
Published on
Updated on

मोरजी: पेडणे पालिका (Pedne Municipality) क्षेत्रातील नानेरवाडा (Nanerwada) पेडणे येथील एका रस्त्याच्या (road) बाजूची धडा कोसळल्यामुळे बाजूलाच असलेल्या गोविंद सामंत यांच्या घरात पाणी जावून नुकसानी झाली आहे , सतत पडत असलेल्या पावसामुळे रस्त्याची जुनी धडा कोसळलेली आहे .(Goa: Road lesson at Nanerwada Pedne collapsed)

कोसळलेल्या रस्त्याची तातडीने नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी पाहणी केली व स्थानिक उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि सार्वजनिक बांधकाम रस्ता विभाग याना कल्पना दिली , अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने काम करणार असल्याचे सांगितले .

नानेरवाडा पेडणे येथील रस्त्याची धडा कोसळली त्याची पाहणी करताना नगराध्यक्ष उषा नागवेकर
Goa: सार्वजनिक गणेशोत्सव दीड दिवस शक्‍य

नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी बोलताना आपण मागच्या पाच वर्षात नगरसेविका होती शिवाय नगराध्यक्ष असताना सरकारच्या माध्यमातून एकूण दहाही प्रभागातून विकास केला ,नगराध्यक्ष पदाचा आपल्याला अनुभव आणि विकासाची भूख आहे त्यामुळे आपल्या हातात जे पद आहे अधिकार आहेत त्याचा वापर आपण जनहितासाठी करणार आहे , आपल्या पाचवर्षाच्या कारकिर्दीत आपल्या प्रभागात नगरसेवक म्हणून सर्व प्रकारची कामे केली ,त्या कामावरच पुन्हा एकदा आपल्याला नागरिकांनी विजयी केले ,उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि भजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनातून विकास करणे हेच उद्दिष्ट आहे आपण सर्व नऊही नगरसेवकांना विश्वासात घेऊन विकास कामे करणार असल्याचे सांगितले.

पालिकेचा महसूल वाढवण्यासाठी या पुढे मोठ्या कल्पना आहेत ,त्या प्रत्यक्षात उतरण्यासाठी जी कोरोनाची महामारी आहे तिच्यावर नियंत्रण यायला हवे ,कोरोनसमुळे विकासाला खीळ बसलेली आहे ,सध्या पालिका क्षेत्रात जी बेकायदा घरे आहेत त्यांच्याकडून घरपट्टी वसूल करण्याचा निर्णय घेतला जाईल ,सध्या आठवड्याचा बसजसर रस्त्यावर बसतो त्यातून वर्षाला 10 लाख रुपये पालिकेला मिळतो ,आता त्याच्यासाठी सुसज्य मार्केट संकुल उभारले जाईल ,त्याअगोदर पालिका प्रशासकीय संकुल उभारून त्यात विविध दुकाने कार्यालये भाडेपट्टीवर देऊन महसूल वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल असे नागवेकर सांगतात .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com