

पणजी: राज्यात बुधवारी कमाल तापमान ३६.५ तर गुरुवारी ३६.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा ३५.६ अंशांपर्यंत पोहोचला होता. मात्र, ३६ अंशांपेक्षा जास्त तापमान यापूर्वी नोंदवले गेले नव्हते. गेल्यावर्षी मात्र मे महिन्याच्या सुरवातीलाच तापमान ३७ अंशांवर गेले होते. तसेच ३ मार्च रोजीही कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. गेल्यावर्षी एप्रिल ते मे या कालावधीत सुमारे सहा वेळा तापमान ३६ अंशांपेक्षा अधिक झाले होते, अशी माहिती गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी दिली.
मागील सहा वर्षांत बहुतांश वेळा तापमान ३६ अंशांच्या आसपासच राहिले आहे. किमान तापमान वाढल्यास उष्मा अधिक तीव्र जाणवतो. त्यात आर्द्रतेत झालेली वाढ ही उकाडा अधिक जाणवण्याचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.दरम्यान, गुरुवारी आणि शुक्रवारी काही प्रमाणात अवकाळी पाऊस पडेल. पुढील काही दिवस उष्मा जाणवेल आणि तापमानात घट होण्याची शक्यता अधिक आहे, असे नहुष कुलकर्णी यांनी सांगितले.
वर्ष कमाल तापमान(अंश सेल्सिअसमध्ये) तारीख
२०२६ ३६.५ ६ मे २०२६
२०२५ ३७.० ३ मे २०२५
२०२४ ३६ १४ मे २०२४
२०२३ ३८.४ ८ मार्च २०२३
२०२२ ३७.४ १३ मार्च २०२२
२०२१ ३६ १२ मे २०२१
२०२० ३६.८ ३१ मे २०२0
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.