Goa: अमली पदार्थांच्या विरोधात 'आरजी' ची आक्रमक भूमिका

मांद्रेमध्ये (Mandre) हल्लीच सरकारने दीड लाख चौरस मीटर क्षेत्रामध्ये एक मोठे मनोरंजन ग्राम उभारण्याची योजना जाहीर केली आहे.
Drugs Business
Drugs BusinessDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: पेडणेच्या (Pernem) रेव्होलुशनरी गोवन्स (Revolutionary Govans) सदस्यांनी पेडणेमध्ये चाललेल्या बेकायदेशीर ड्रग्स व्यवसायाबद्दल (Drugs Business) तीव्र निषेध व्यक्त केला. त्यात पेडणेचे आमदार बाबू आजगावकर (Babu Azgavkar) आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी मांद्रेमध्ये मनोरंजन ग्राम सारखा प्रकल्प आणण्याचा निर्णय घेवून इथल्या गावांचे अस्तित्व मिटविण्याचा डाव चिंतला असल्याचा आरोप त्यांनी केला. मांद्रेमध्ये हल्लीच सरकारने दीड लाख चौरस मीटर क्षेत्रामध्ये एक मोठे मनोरंजन ग्राम उभारण्याची योजना जाहीर केली आहे.

पर्यटन हंगामात आधीच किनारपट्टी भागात अनेक संगीतरजनी चे कार्यक्रम, खाद्य महोत्सव आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यामुळे स्थानिकांची गैरसोय होते. हे कार्यक्रम ड्रग्ज आणि वेश्याव्यवसायासारख्या गैव्यवहाराना चालना देतात. पेडणेच्या तालुकाध्यक्ष सुनयना गावडे यांनी पेडणेचा वारसा, संस्कृती आणि त्यांची ओळख जपण्याची गरज आहे आणि त्यास नार्को पॅराडाइझमध्ये बदलू नये, असे सांगितले.

Drugs Business
Goa: अखेर बेकायदा दुकाने जमीनदोस्त

"या मनोरंजन ग्रामात, भविष्यात लहान, मध्यम प्रमाणात करमणुकीचे कार्यक्रम आणि अगदी इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीत (ईडीएम) महोत्सव आयोजित करण्याची सुविधा उपलब्ध होईल असे आजगावकर सांगत आहेत. मनोरंजन ग्रामाच्या नावाखाली येथे सेक्स, ड्रग आणि वेश्या व्यवसायसारखे सर्व अवैध प्रकार वाढतील, ”असे गावडे म्हणाल्या.

"आम्हाला इथल्या लोकांनी कायम भीतीच्या सावटाखाली राहावं असं वाटत नाही. आम्हाला हे ठिकाण ड्रगच्या गुन्हेगारीचे आश्रयस्थान नको आहे. पेडणेमध्ये व आजूबाजूच्या किनारपट्टीच्या गावांमध्ये अंमली पदार्थांच्या जप्तीची घटना हल्ली खूपच पाहायला मिळतात. त्यामुळे आम्हाला वाटते की अंमली पदार्थांचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने काही कठोर कारवाई केली पाहिजे. आम्ही या प्रकल्पाचा विरोध करतो कारण हा प्रकल्प येथे आणण्यासाठी, स्थानिकांचा विचार घेतलेला नाही आहे. जर स्थानिक यासाठी विरोध करीत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा दर्शविला जाईल", त्या म्हणाल्या.

Drugs Business
Goa : रॉलन्ड फर्नांडिस यांच्या हस्ते शवागाराचे उद्घाटन

अलीकडेच गोवा पोलिसांनी मुरगाव येथे झारखंड येथील रहिवाश्यास, उत्तर गोवा किनारपट्टी पट्ट्यात अमली पदार्थांच्या व्यापाराच्या कारणावरून अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी सुमारे 2,4०० किलो गांजा जप्त केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com