स्वातंत्र्यसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही! सैनिकांच्या मुलांना पुढील 18 जूनपर्यंत नोकऱ्या देणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

18 जून हा दिवस गोव्यात क्रांतीदिन म्हणून साजरा केला जातो.
Goa Revolution Day
Goa Revolution DayDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Revolution Day: 18 जून हा दिवस गोव्यात क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. 18 जून 1946 मध्ये मुक्तीची क्रांती पेटली होती. यानिमित्ताने आज आझाद मैदानावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत क्रांतीदिन साजरा करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असणाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असे विधान केले आहे.

Goa Revolution Day
स्वातंत्र्यसैनिकांचा अनमोल ठेवा आज गोमंतकीयांसमोर खुला होणार, पुराभिलेख सप्ताह प्रदर्शनाचे आयोजन

क्रांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या सर्व सैनिकांचे अभिवादन केले. स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकरी देण्याचा मुद्दा काही काळापासून रखडला आहे.

याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, पुढील क्रांती दिनापर्यंत स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकरी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच ज्या सैनिकांना अजूनही पेन्शन मिळत नाही त्यांना पुढील दीड महिन्यात पेन्शन सुरू करण्यात येणार आहे. सरकार नेहमी तुमच्यासोबत असून कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही.

ते पुढे म्हणाले की, पुढील शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या अभ्यासक्रमात क्रांती दिनाचा इतिहास समाविष्ट करण्यात येणार आहे.

दरम्यान, पुढील वर्षाच्या 18 जूनपर्यंत स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना 100 टक्के सरकारी नोकरी मिळणार असल्याची हमी यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, पोर्तुगीज राजवटीत गोव्याच्या मुक्तीसाठी दिलेल्या लढ्याबद्दल स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ पुराभिलेख विभाग दरवर्षी १८ जूनपासून पुराभिलेख सप्ताह प्रदर्शन आयोजित करते. गोवा मुक्ती चळवळीशी संबंधित पुराभिलेखागारामध्ये उपलब्ध विविध ऐतिहासिक नोंदी प्रदर्शित केल्या जात आहेत.

मडगावच्या लोहिया मैदानावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हे प्रदर्शन खुले करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Cabinet Decisions, CM Pramod Sawant
Goa Surla Farmers Compensation
Goa Olympians Development
Goa CM Pramod Sawant accident help
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com