Goa Corona Update: गोव्यात 237 सक्रिय कोरोना रूग्ण, आज 30 नव्या रूग्णांची नोंद

गोव्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.37 टक्के एवढा झाला आहे.
Goa COVID-19 Update
Goa COVID-19 UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील कोरोना संसर्गाचा जोर ओसरत आहे. आज दिवसभरात 30 नव्या रूग्णांची नोंद झाली असून, 34 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज 751 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले. राज्यातील सक्रिय कोरोनाची संख्या घटली आहे. सध्या गोव्यात 237 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गोव्याचा रिकव्हरी रेट वाढून 98.37 टक्के एवढा झाला आहे.

Goa COVID-19 Update
Vasco: गोरगरिबांना कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या नूर अहमदची सुनावणी पुढे ढकलली

गोवा आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 58 हजार 120 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 53 हजार 917 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील तीन आठवड्यात राज्यात एकाही कोरोना रूग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आजवर राज्यात 3,966 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Goa COVID-19 Update
ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनचा वापर सरकारने कंत्राटदारांच्या बिलासाठी केला; विजय सरदेसाईंचा आरोप

देशात 38,293 सक्रिय कोरोना रूग्ण

देशातील कोरोना रूग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 3,792 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असून, 5,069 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला देशात 38,293 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत 13 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर देशात 5 लाख 28 हजार 655 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com