प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) सोशल मेसेजिंग साईट ट्विटरच्या प्रमुखपदाचा लवकरच राजीनामा देणार आहेत. याबाबत त्यांनी नुकतीच ट्विटरवरती घोषणा केली आहे. मस्क यांनी प्रमुखपदावर रहावे का राजीनामा द्यावा याबाबत त्यांनी सोशल पोल घेतला होता त्यात 57.5 टक्के लोकांनी येस असे उत्तर दिले आहे.
(Elon Musk To Resign As twitter CEO Soon)
इलॉन मस्क यांनी काही वेळापूर्वी ट्विट करत आपण लवकरच ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा देणार आहोत असे म्हटले आहे. मला ट्विटर चालविण्यासाठी एका मूर्ख व्यक्तीची गरज आहे, तो भेटला की मी सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीम यातच लक्ष देणार आहे. असे ट्विट खुद्द मस्क यांनी केले आहे. मस्क यांनी अलिकडेच ट्विटरची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर अनेक बदल त्यांनी ट्विटरमध्ये केले होते. अनेकांनी या बदलांचे स्वागत केले होते तर, अनेकांनी यावर टीका केली होती. यावरून सतत ट्रोल झाल्यानंतर त्यांनी आपण ट्विवटरच्या प्रमुखपदावर रहावे का नाही याबाबत पोल घेतला होता. अनेकांना मस्क यांनी पायउतार व्हावे याबाजून आपले मत नोंदवले आहे.
दरम्यान, या पोल नंतर 57.5 टक्के लोकांनी येस असे उत्तर दिले आहे तर, 42.5 टक्के लोकांनी नो असे उत्तर दिले आहे. पोलचा कल मस्क यांनी राजीनामा द्यावा असा असल्याने मस्क यांनी ट्विटरचे प्रमुखपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच याठिकाणी नवीन व्यक्ती विराजमान झालेला दिसेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.