Goa Rain : गोव्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या निम्माही पाऊस नाही

मागील दोन वर्षांच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पडलेल्या एकूण पावसाच्या सरासरी निम्मा पाऊस यंदाच्या ऑगस्टमध्ये झाला आहे.
Goa Rain Update
Goa Rain UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Rain : गोव्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नसल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पडलेल्या एकूण पावसाच्या सरासरी निम्मा पाऊस यंदाच्या ऑगस्टमध्ये झाला आहे. कमी पावसामुळे पाण्याची समस्या भेडसावण्याची चिंताही व्यक्त केली जात आहे.

गोव्याचा मागील दोन वर्षांचा ऑगस्टमधील पाऊस हा सरासरी 759 मिमी नोंदवला गेला आहे. मात्र यावर्षी गोव्यात ऑगस्ट महिन्यात केवळ 369 मिमी पाऊस झाला आहे. हाच पाऊस मागच्या वर्षी 367 मिमी पडला होता. मात्र असं असलं तरीही गोव्यात मागील दोन वर्षांमध्ये 1170 मिमी आणि 1158 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली होती. दरम्यान गोव्यात या आठवड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. ऐन गणेश चतुर्थीत मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे गोवेकरांच्या चिंतेत काहीशी भर पडणार आहे.

Goa Rain Update
वाळपईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; झाडांची पडझड, विद्युत लाईन तुटली

दरम्यान बुधवारी वाळपई परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वाळपईच्या विविध भागात यामुळे झाडांची पडझड झाली असून, काही ठिकाणी विद्युत लाईन देखील तुटली. विद्युत लाईन तुटल्याने अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला.

हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. बुधवारी सायंकाळी पावसाने वाळपई परिसरात जोरदार हजेरी लावली. यामुळे झाडांची पडझड झाली तसेच, वीजच्या देखील तारा तुटल्या. रस्त्यात पडलेल्या झाडांमुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळित झाली. वीज ताऱ्या तुटल्याने वाळपई, वास्को सह गोव्यातील काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com