Goa Accident News: गोव्यात 'रोड सेफ्टी वीक'च्या पहिल्याच दिवशी अपघातांची मालिका; २४ तासांत पाच घटना

Road Safety Week Goa: राज्यात वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहनचालकांमध्ये नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या रोड सेफ्टी वीकचे आयोजन करण्यात आलेय, मात्र रोडसेफ्टी वीकची सुरुवात होऊन २४ तासही पूर्ण झालेले नसताना राज्यात पाच नवीन अपघातांची नोंद झाली आहे.

Goa Accident NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident News

पणजी : गोव्यात सोमवारपासून रोड सेफ्टी वीकची सुरुवात झाली आहे. १४ ते २१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहनचालकांमध्ये नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या रोडसेफ्टी वीकचे आयोजन करण्यात आलं आहे. (Road Safety Week)

सोमवारी पाहिल्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील वाढणाऱ्या अपघातांबद्दल बोलताना दारू पिऊन गाडी चालवणे कसे हानिकारक आहे हे सांगत इतर महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केले होते.

रोड सेफ्टीबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी भिवपाची गरज असा असे म्हणतात गोमंतकवासियांनी जबाबदारीने वाहनं चालवण्याची विनंती देखील केली होती. मात्र रोडसेफ्टी वीकची सुरुवात होऊन २४ तासही पूर्ण झालेले नसताना राज्यात पाच नवीन अपघातांची नोंद झालीये.

चौवीस तासांत गोव्यात झालेला सर्वात पहिला अपघात एका चारचाकी चालकाचा होता. पादचारी क्रॉसिंग टाळण्याचा प्रयत्न करताना, त्याने गाडीवरचे नियंत्रण गमावले आणि गाडी फूटपाथवर धडकली.

दुसऱ्या घटनेत, एक आंतरराज्यात प्रवास करणारी बस राष्ट्रीय महामार्ग 66 वरून जात असताना काणकोणजवळील एका गावात झाडाला आदळली, यामध्ये चालक आणि एक प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Road Safety Week Goa: राज्यात वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहनचालकांमध्ये नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या रोड सेफ्टी वीकचे आयोजन करण्यात आलेय, मात्र रोडसेफ्टी वीकची सुरुवात होऊन २४ तासही पूर्ण झालेले नसताना राज्यात पाच नवीन अपघातांची नोंद झाली आहे.
Goa Road Accident: गोव्यात 3 अपघातांत 3 ठार; संतप्‍त लोकांनी रोखला महामार्ग

तिसरा अपघात फर्मागुडी- ढवळी फ्लायओव्हर जवळ झालाय. चारचाकी चालकाने नियंत्रण गमावल्याने गाडी थेट विजेचा खांबाला आदळली, मात्र सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही.

चौथा अपघात पेडण्यातील तुये या गावात घडला, एक दुचाकीस्वार आणि चारचाकी चालक एकमेकांना चुकवण्याचा प्रयत्न करत असताना विजेचा खांबाला धडकले आणि यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत.

काल रात्री राज्यात एक विचित्र घटना घडली ज्यात दावर्ली चर्चजवळ एक बीएमडब्ल्यू कार आगीत जळून खाक झाली. सुदैवाने सर्व प्रवासी मात्र यामधून सहीसलामत बचावले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com