Viral Post: गैरवर्तन भोवलं! सोमवारी कामावर घेतलं शुक्रवारी हाकलंल; गोव्यातील कंपनी संस्थापकाचे होतंय कौतुक

Jatin Saini Linkedin Post: जाहिरात एजन्सी हाऊस ऑफ क्रिएटर्सचे संस्थापक जतिन सैनी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
Jatin Saini Linkedin Post
Jatin Saini Linkedin PostDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जाहिरात एजन्सी हाऊस ऑफ क्रिएटर्सचे संस्थापक जतिन सैनी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांचं एका कर्मचाऱ्याविरोधात घेतलेलं तातडीचं आणि कठोर पाऊल अनेकांनी योग्य ठरवलं असून लिंक्डइनवर त्यांच्या निर्णयाचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे. संस्थापक जतिन सैनी हे गोव्याचे आहेत.

घटना अशी की, जतिन सैनी यांनी एका वरिष्ठ कर्मचाऱ्याची सोमवारी नियुक्ती केली होती. परंतु, अवघ्या चार दिवसांतच या कर्मचाऱ्याचं वर्तन इतकं चुकाचं ठरलं की शुक्रवारी त्याला कामावरून हटवावं लागलं. सैनी यांनी ही माहिती स्वतः लिंक्डइनवर एका पोस्टद्वारे शेअर केली आहे.

सैनी यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, त्या वरिष्ठ कर्मचाऱ्याने एका सहकाऱ्याशी अत्यंत उद्धट आणि अपमानास्पद भाषेत संवाद साधला होता. त्या वरिष्ठ कर्मचाऱ्याने सहकाऱ्याशी बोलताना म्हटलं होत की, "तुम्ही तुमचा मेंदू घरी सोडला होता का? हेच तुमचं बेस्ट असेल, तर तुम्ही नवीन नोकरी शोधा. उद्या मेंदू घेऊन या, नाहीतर येण्याची गरज नाही!"

हा अपमान ऐकून सैनी यांनी त्या कर्मचाऱ्याशी संवाद साधत त्यांच्या वादग्रस्त टिप्पणीमागचं स्पष्टीकरण मागितलं. त्यांनी स्पष्ट केलं की,"कोणालाही त्याचा दिवस अपमानित वाटून संपवू नये विशेषतः शुक्रवारसारख्या दिवशी, ज्यामुळे संपूर्ण वीकेंड खराब होऊ शकतो."

तरीही, कर्मचाऱ्याने पश्चात्ताप व्यक्त न करता वाद अधिक चिघळवला आणि म्हटलं, "अशा पद्धतीनेच मजबूत संघ तयार होतो. यामुळे सैनी यांनी त्वरित निर्णय घेत त्या वरिष्ठ कर्मचारी हकालपट्टी केली.

सैनी यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केलं की, "आम्ही लोकांना तोडून नाही, तर जोडून वैयक्तिक ब्रँड तयार करतो. त्यामुळे आता आम्ही एक अशा व्यक्तीच्या शोधात आहोत जी कुशल, शिकण्यास उत्सुक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतरांचा आदर करणारी असेल." या पोस्टनंतर लिंक्डइनवर अनेकांनी सैनी यांच्या संवेदनशीलतेचं आणि नेतृत्वगुणांचं कौतुक केलं.

जतिन सैनी यांचं होतंय कौतुक

जतिन सैनी यांच्या या निर्णयामुळे त्याचं सोशल मिडियावर कौतुक केलं जातं आहे. एका लिंक्डइन वापरकर्त्याने, तुमचं वर्तन कौतुकास्पद आहे. हे प्रत्येक संस्थापकाने शिकायला हवं. अशी कमेंट केलीय. तर आणखी एका वापरकर्त्याने,"तुमचं वैयक्तिक ब्रँडिंगही योग्य उदाहरण देतंय की तुमचं नेतृत्व कोणत्याही एका व्यक्तीच्या कौशल्यावर अवलंबून नाहीय."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com