Syed Mushtaq Ali Trophy: गोव्याची विजयी सलामी; त्रिपुरा विरोधात पाच गडी राखून विजय

T20 क्रिकेट स्पर्धेत: त्रिपुराचे आव्हान गोव्याने पेलले
तुनीष सावकार
तुनीष सावकार
Published on
Updated on

पणजी: सय्यद मुश्ताक अली करंडक T20 क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच सामन्यात गोवा संघाने बाजी मारली आहे. त्रिपुरा संघाने दिलेल्या 115 धावांचा पाठलाग करताना गोव्याची सात षटकात 4 बाद 20 अशी स्थिती झाली. पण, त्यानंतर आलेल्या खेळाडूंनी डाव सावरत पहिल्या सामन्यात संघाला विजय मिळवून दिला.

राजस्थानमधील जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर मंगळवारी गोवा आणि त्रिपुरा यांच्यात सामना झाला. गोव्याने नाणेफेक जिंकून त्रिपुरास प्रथम फलंदाजीस पाचारण केले. अमित यादव (3-10) याच्या प्रभावी फिरकीच्या बळावर गोव्याने त्रिपुरास 8 बाद 114 धावांत रोखले. हुकमी खेळाडू व कर्णधार वृद्धिमान साहा याला लक्षय गर्गने कर्णधार स्नेहल कवठणकर याच्याकरवी झेलबाद करून त्रिपुरास पहिला धक्का दिला, त्यानंतर त्यांना सावरणे कठीण गेले.

नंतर प्रारंभीच्या धक्क्यांनंतर गोव्याने 18.1 षटकांत 5 बाद 118 धावा करून सामना जिंकला. आदित्य कौशिक (3), स्नेहल कवठणकर (1), सिद्धेश लाड (7) व सुयश प्रभुदेसाई (6) हे मुख्य फलंदाज लवकर बाद झाल्यामुळे गोव्याचा डाव संकटात सापडला. गोव्याचा संघ बुधवारी (ता.12) मणिपूरविरुद्ध खेळेल.

तुनीष सावकार
Savio Rodrigues यांचा भाजपला घरचा आहेर; कला अकादमी निविदा प्रक्रियेची चौकशीची मागणी

इम्पॅक्ट खेळाडूंचा प्रभाव

स्पर्धेत यंदापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इम्पॅक्ट (बदली) खेळाडूचा नियम अमलात आणला आहे. त्याचा लाभ गोव्याला या लढतीत झाला. संघ संकटात असताना इम्पॅक्ट खेळाडू तुनीष सावकार याने एकनाथ केरकर याच्यासह त्रिपुरावर हल्ला चढविला आणि सामन्याचे पारडे फिरवले. तुनीषने 25 चेंडूंत तीन चौकार व दोन षटकारांसह 36 धावा करताना एकनाथसह पाचव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. नंतर एकनाथनने दीपराज गावकरसह सहाव्या विकेटसाठी 47 धावांची अभेद्य भागीदारी करून गोव्याला विजय मिळवून दिला. एकनाथने 29 चेंडूंत तीन चौकार व एका षटकारासह 34 धावा, तर दीपराजने 14 चेंडूंत तीन चौकार व एका षटकारासह 28 धावा केल्या.

तुनीष सावकार
Land Grabbing Case: अखेर मामलेदार राहूल देसाई सेवेतून निलंबित; SIT कडून अटक

संक्षिप्त धावफलक

त्रिपुरा: 20 षटकांत 8 बाद 114 (बिक्रमकुमार दास 17, श्रीदम पॉल 17, रजत डे 17, सयान घोष नाबाद 24, राणा दत्ता नाबाद 11, लक्षय गर्ग 4-0-29-2, अर्जुन तेंडुलकर 3-0-20-0, फेलिक्स आलेमाव 3-0-17-1, अमित यादव 3-0-10-3, सिद्धेश लाड 4-0-15-1, दर्शन मिसाळ 3-0-20-1) पराभूत

वि. गोवा: 18.1 षटकांत 5 बाद 118 (आदित्य कौशिक 3, स्नेहल कवठणकर 1, सिद्धेश लाड 7, सुयश प्रभुदेसाई 6, तुनीष सावकार 36, एकनाथ केरकर नाबाद 34, दीपराज गावकर नाबाद 28, मुरासिंग 1-15, अभिजित सरकार 1-14, दीपक खत्री 1-23, शंकर पॉल 1-15).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com