HIV AIDS In Goa: गोव्यात दहा महिन्यात 209 HIV रूग्ण, महिलांचे प्रमाण सर्वाधिक

राज्यात किनारी भागात एचआयव्ही बाधितांची संख्या जास्त
HIV AIDS In Goa
HIV AIDS In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

World AIDS Day: एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. गोव्यातील एचआयव्ही बाधित आणि एड्स रुग्णांची संख्या लक्षात घेता गेल्या पाच वर्षांमध्ये संक्रमणाचा दर कमी होताना दिसत आहे. गोव्यात मागील दहा महिन्यात 209 HIV रूग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये 52.1 टक्के महिलांचे प्रमाण आहे तर, 38 टक्के प्रमाण पुरूषांचे आहे.

HIV AIDS In Goa
Goa Congress: गोवा काँग्रेसला उभारी मिळणार का? नव्या चेहऱ्यांसह 14 सरचिटणीस, 5 उपाध्यक्षांची निवड

गोवा एड्स कंट्रोल सोसायटीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सावंत म्हणाले की, यंदाच्या जागतिक एड्स दिनाचे लक्ष्य समानता हे आहे. जगभरात एचआयव्ही बाधितांचे प्रमाण 38.4 कोटी आहे. नव्याने 1.5 कोटी लोक बाधित झाले आहेत. देश पातळीवर हेच प्रमाण 23.29 लाख आहे, तर नव्याने 57 हजार जणांना एचआयव्हीची बाधा झाली आहे. राज्यात 1987 पासून एकूण बाधितांची संख्या 17 हजार 996 आहे. यंदा नव्याने बाधित झालेल्यांची संख्या 209 आहे. सध्या 3,191 रुग्ण औषधोपचार घेत आहेत. हे प्रमाण 2007 पासून सातत्याने कमी होत आहे. 2005 साली संक्रमणाचा दर 7.19 होता. आज तो 0.21 वर आला आहे. 94 टक्के बाधितांचे प्रमाण हे लैंगिकतेशी संबंधित असल्याने आजही हा सामाजिक ठपका मानला जातो. त्याचा परिणाम बाधितांच्या जीवनमानावर होतो. यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत  बाधितांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेण्यापासून औषध पुरवठा, सल्ला, आर्थिक मदत पुरवली जात आहे.

HIV AIDS In Goa
Petrol-Diesel Price In Goa: खूशखबर! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, काय आहेत गोव्यातील आजचे इंधनाचे दर

2018 साली 0.35 टक्के असलेले संक्रमण यावर्षी 0.21 झाले आहे. मात्र, ते शून्य झालेले नाही. 2030 पर्यंत हे प्रमाण शून्यावर आणणे, हे आरोग्य यंत्रणेचे लक्ष्य आहे. यासाठी आरोग्य प्रशासन वेगवेगळ्या पातळीवर सातत्याने प्रयत्न करत असल्याची माहिती गोवा एड्स कंट्रोल सोसायटीचे प्रकल्प अधिकारी डॉ. गोकुळदास सावंत यांनी दिली.

मागील पाच वर्षातील आकडेवारी (वर्ष-रूग्ण)

2018 - 280

2019 - 293

2020 - 187

2021 - 234

2022 - 209

- गोव्यात किनारी भागात एचआयव्ही बाधितांची संख्या जास्त आहेत.

- 65.4 टक्के केसेस 15 ते 49 वयोगटातील आहेत.

- देशात जनजागृती आणि व्यवस्थापनात गोवा एड्स कंट्रोल सोसायटी प्रथम क्रमांकावर आहे.

HIV AIDS In Goa
Michael Lobo: लोबोंचे कतार प्रेम, 974 स्टेडियमच्या कौतुकावरून लोबो आणि सरदेसाई यांच्यात रंगला सामना

डॉक्टरांचा सल्ला

- सुरक्षित लैंगिक संबंध, कॉन्डोमचा वापर करणे

- हाय रिस्क संबंध टाळणे

- बाधा झाल्यास योग्य ती काळजी घेणे, नियमित औषधोपचार, योग्य आहार आणि व्यायाम करणे

- शारीरिक चाचणीबरोबरच व्हायरल लोड, सीडी-4 काउंट तपासणे

- अल्कोहोल, ड्रग्सपासून दूर राहणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com