Ration Card: गोव्यातील 350 हून अधिक रेशनकार्ड ‘सरेंडर’! उत्पन्न मर्यादेचा भंग; 103 नवीन कार्ड वितरित

Ration Card Goa: गोव्यात मागील ४५ दिवसांत वार्षिक उत्पन्न वाढलेल्या आणि श्रेणी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या लाभार्थी कुटुंबांनी ३५० हून अधिक रेशनकार्ड ''सरेंडर'' केली आहेत.
Ration Card e-KYC
Ration Card e-KYCDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात मागील ४५ दिवसांत वार्षिक उत्पन्न वाढलेल्या आणि श्रेणी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या लाभार्थी कुटुंबांनी ३५० हून अधिक रेशनकार्ड ''सरेंडर'' केली आहेत. नागरी पुरवठा खात्याला परत केलेल्या रेशनकार्डांपैकी उत्तर गोव्यातून २४६ आणि दक्षिण गोव्यातून १४१ जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, समर्पण म्हणजेच परत केलेल्या कार्डांपैकी ८९ टक्के कार्ड हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएफएसए) आणि बीपीएल (दारिद्र्य रेषेखालील) श्रेणीतील आहेत,

तर फक्त १० टक्के एपीएल (दारिद्र्य रेषेवरील) कार्डे आहेत. तसेच, याच ४५ दिवसांच्या कालावधीत १०० नवीन एपीएल रेशनकार्ड जारी करण्यात आले, बहुतेक अशा लाभार्थी कुटुंबांनी आपले एनएफएसए आणि बीपीएल कार्ड सरेंडर केली आहेत.

अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात २.६२ लाखांहून अधिक रेशनकार्ड आहेत, जे आजपर्यंत सक्रिय आहेत. यापैकी १.२४ लाख कार्डे पीएचएच (प्राधान्य गृह कार्ड) आणि अंत्योदय अन्न योजना (एएवाय) कार्डे आहेत, जी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या (एनएफएसए) अंतर्गत येतात. तर उर्वरित १.३७ लाख कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील (एपीएल) आहेत.

Ration Card e-KYC
Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! ई-केवायसी नसेल तर कट होईल नाव, जाणून स्टेप्स बाय स्टेप्स प्रोसेस येथे

रेशनकार्डच्या नियमांनुसार आता लाभार्थ्यांना डिजिटल केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. ज्यामुळे नागरी पुरवठा निरीक्षकांना लाभार्थ्यांची पडताळणी करणे सोपे होणार आहे. नवीन नियमांनुसार, एससी-एसटी समुदायातील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ५० हजार ते एक लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना त्यांचे ‘एनएफएसए‘कार्ड परत करावे लागतील. त्यानंतर बीपीएल कार्डसाठी अर्ज करण्यास ते पात्र ठरतात, जर वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्या कुटुंबाला कार्ड परत करावे लागत आहे.

Ration Card e-KYC
Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी; लगेच करा 'हे' काम, अन्यथा धान्य मिळणार नाही

१०३ नवीन कार्ड वितरित

जुलै-ऑगस्टमध्ये रेशनकार्ड परत करणाऱ्या कुटुंबांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ‘एनएफएसए‘अंतर्गत येणाऱ्या एकूण ३८७ कार्ड परत केले आहेत, तर ‘एपीएल'' रेशनकार्ड असलेल्या ४४ कुटुंबांनी या ४५ दिवसांच्या कालावधीत त्यांचे कार्ड परत केले आहेत. दरम्यान, १०३ लाभार्थी कुटुंबांना नवीन कार्ड दिले आहेत, त्यापैकी बहुतेक ३८७ जणांनी त्यांचे ‘एनएफएसए‘ कार्ड परत केले आणि ‘एपीएल'' कार्डसाठी पुन्हा अर्ज केला. १०३ नवीन कार्ड उत्तर गोव्यातील कुटुंबांना वितरित केल्याचे नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com