Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! ई-केवायसी नसेल तर कट होईल नाव, जाणून स्टेप्स बाय स्टेप्स प्रोसेस येथे

Ration Card: देशभरात लाखो नागरिकांना रेशन कार्डद्वारे स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येतं.
Ration Card e-KYC
Ration Card e-KYCDainik Gomantak
Published on
Updated on

देशभरात लाखो नागरिकांना रेशन कार्डद्वारे स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येतं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो. मात्र, या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी आता ‘ई-केवायसी’ करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्यानं रेशन कार्डांच्या ई-केवायसी प्रक्रेसंदर्भात अंतिम मुदत जाहीर केली आहे. खात्यानं काढलेल्या अधिसूचनेनुसार, ३० एप्रिल २०२५ ही रेशन कार्डांच्या ई-केवायसीसाठी अंतिम मुदत असेल.

जर या मुदतीपर्यंत संबंधित नागरिकांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांच्या रेशन कार्डावरील नावं वगळण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पुरवठा खात्यानं दिला आहे. त्यामुळे अनेकांना शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मिळणाऱ्या धान्याचा लाभ पुढे मिळणार नाही.

Ration Card e-KYC
Gas Cylinder Explosion: चिंबल पंचायतीजवळील बंद घरात स्फोट, तब्बल 10 लाखांचे नुकसान; तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

रेशन कार्ड हे केवळ स्वस्त दरात रेशन मिळवण्याचे साधन नाही, तर ते प्रत्येक नागरिकाच्या ओळखीचे दस्तऐवज म्हणूनदेखील वापरले जाते. त्यामुळे त्याची अचूकता आणि प्रमाणीकरण आवश्यक ठरते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०१३ साली देशभरात अनेक नागरिकांनी रेशन कार्डसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, त्या घटनेला आता १० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. नियमानुसार, दर पाच वर्षांनी ई-केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे.

सध्या ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध आहे. नागरिकांनी घरबसल्या, केवळ मोबाईल आणि इंटरनेटच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. जर तुम्ही अद्याप तुमचे ई-केवायसी केले नसेल, तर खाली दिलेल्या सोप्या पायऱ्या फॉलो करून तुम्ही हे सहज करू शकता.

Ration Card e-KYC
Goa Education: शिक्षण कायद्यात होणार बदल! अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची सुरक्षा यांवर विशेष लक्ष; माहिती घ्या..

ई-केवायसी करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकता

  • ॲंड्रॉइड मोबाइलवर ‘Mera E KYC’ टाइप करून ॲप डाउनलोड करावा लागेल.

  • त्यावर आधार क्रमांक जोडण्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. नंतर ‘ओटीपी’ टाकावा लागेल.

  • त्यानंतर https://play.google.com /store/apps/details?id=in.gov. uidai.facerd या दुसऱ्या ॲपद्वारे तुमच्या चेहऱ्याचे छायाचित्र घेतले जाईल. आणि आधार क्रमांक रेशनकार्ड अथवा शिधापत्रिकेशी जोडले जाईल.

  • त्यानंतर ‘ई-केवायसी’ पूर्ण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com