Rasika Khandeparkar : विमान प्रवास, दिल्ली भेट अन्‌ राष्ट्रपती भवन...

रसिका नि:शब्दच : राष्ट्रपतींच्या हस्ते स्वच्छ सुजल शक्ती सन्मानाने गोव्याचा गौरव
Rasika Khandeparkar
Rasika KhandeparkarDainik Gomantak
Published on
Updated on

Rasika Khandeparkar : पाचवीला पूजलेले दारिद्र्य, त्यातच पतीचे आकस्मिक निधन, पदरात असलेला एकुलता एक मुलगा...असा संसाराचा गाडा हाकत पुढे जाणाऱ्या रसिका खांडेपारकर यांनी स्वच्छतेचा संदेश दिल्लीपर्यंत पोहोचविला. आर्थिक परिस्थितीमुळे दिल्ली तर सोडाच, कधी विमान प्रवासाचाही विचार मनी न आणणाऱ्या रसिकाने चक्क राष्ट्रपती भवनही गाठले.

राज्याचे प्रतिनिधित्व करीत रसिका यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वच्छ सुजल शक्ती सन्मानही स्वीकारला. हा सन्मान केवळ रसिका यांचाच नव्हता, तर तो राज्याचाही होता. पिसुर्ले गावचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या रसिका यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे सफाई कामगारांचे कार्य समाजासमोर आले आहे.

Rasika Khandeparkar
Goa Shigmotsav 2023 : शिगमोत्सव परंपरा मोडू नका; मिरवणूक रविवारीच हवी!

स्वच्छ सुजल शक्ती सन्मान पुरस्कारासाठी जेव्हा जाहिरात आली, तेव्हा पिसुर्ले पंचायत सचिव आणि पंचायत मंडळाने रसिका खांडेपारकर यांच्यातील प्रामाणिकपणे काम करण्याचा गुण हेरून त्यांच्या नावाची शिफारस केली होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या छाननीवेळीही त्यांचीच निवड झाली. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला.

रसिका खांडेपारकर गेल्या सात वर्षांपासून पिसुर्ले गावात सफाई कामगार म्हणून काम करतात. पंचायतीच्या वाहनातून घरोघरी फिरून कचरा गोळा करणे, त्या कचऱ्याचे विलगीकरण करणे, गावातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी असलेला कचरा उचलणे, कचरा स्क्रॅप डिलरला पाठवणे आदी कामे या पंचायतीचे सफाई कामगार करतात.

रसिका ही कामे निष्ठेने करतात. त्यांना हे काम कधी कमी दर्जाचे वाटले नाही किंवा या कामाचा त्यांनी तिरस्कार केला नाही. कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणामुळेच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

Rasika Khandeparkar
'ऑपरेशन दोस्त'ची परतफेड? भारताकडून मिळालेल्या मदतीनंतर तुर्कीने जिनिव्हा OIC मध्ये उपस्थित केला J&K चा मुद्दा

आणि ‘ती’ स्वच्छता दूत बनली

जेमतेम शिकलेली ही महिला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून सफाई कामगार म्हणून रुजू झाली. आपले काम प्रामाणिकपणे करीत गावचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ती सध्या वावरत आहे. रसिका यांच्या पतीचे गेल्या वर्षी अकाली निधन झाले. त्यांचा मुलगा दहावीत शिकत आहे.

या महिलेला आई-बाबा किंवा घरात इतर कोणाचीही साथ नाही. अशा स्थितीत या महिलेने जिद्द सोडली नाही. दुर्गंधीयुक्त वातावरणात गाव स्वच्छ ठेवण्याची नोकरी सांभाळत तिने वेगळाच आदर्श सर्वांसमोर ठेवला.

सत्तरीत 67 सफाई कामगार

सत्तरीतील 12 ग्रामपंचायती आणि एक नगरपालिका मिळून एकूण 67 सफाई कामगार काम करतात. हे सफाई कामगार सत्तरी तालुका स्वच्छ ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहेत. रसिका खांडेपारकर यांना पुरस्कार मिळाल्यानंतर या सफाई कामगारांच्या कार्याचे महत्त्व वाढले आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे.

सगळे काही स्वप्नवत

या पुरस्काराबद्दल रसिका यांनी आनंद व्यक्त केला. सफाई कामगार म्हणून काम करून आपण दिल्लीपर्यंत कसे काय पोहचू शकतो, याचेच तिला आश्चर्य वाटले. राष्ट्रपतींच्या हस्ते माझा सन्मान होईल, याची जराशीही कल्पना मी केली नव्हती. माझ्या आयुष्यातील या सर्व गोष्टी स्वप्नवत आहेत, असे रसिका खांडेपारकर म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com