Goa Weather: राज्यात पुढील चार दिवस तुरळक पावसाची शक्यता

Goa Rain News: राज्यात मागील २४ तासांत एकूण ३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात एकूण ३५९.९ मिमी इतका पाऊस बरसला आहे.
Goa Weather: राज्यात पुढील चार दिवस तुरळक पावसाची शक्यता
Goa Rain UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon 2024

राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार बरसणारा पाऊस काही प्रमाणात मंदावणार असल्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली असून राज्यात पुढील चार दिवस ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात मागील २४ तासांत एकूण ३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात एकूण ३५९.९ मिमी इतका पाऊस बरसला आहे.

Goa Weather: राज्यात पुढील चार दिवस तुरळक पावसाची शक्यता
Goa Todays Update: जीएसटी कौन्सिलच्या कायमस्वरुपी सदस्यपदावरुन मॉविन गुदिन्हो यांची उचलबांगडी

मागील २४ तासांत सर्वाधिक ६३.९ मिमी इतक्या पावसाची नोंद राजधानी पणजी येथे करण्यात आली असून त्याखालोखाल मुरगाव ५९.६ मिमी, केपे ३८ मिमी, पेडणे ३५.४ मिमी, दाबोळी ३४.५ मिमी, जुनेगोवे ३० मिमी, साखळी २५.४ मिमी, मुरगाव २२ मिमी, सांगे २०.९ मिमी, फोंडा १५.८ मिमी, काणकोण ८.२ मिमी, म्हापसा ५.३ मिमी, तर वाळपईत सर्वात कमी २.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com