
पणजी: गेल्या काही दिवसांपासून गोव्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये जलमय स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील सहा दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे ३ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर १, २, ४, ५ आणि ६ सप्टेंबरसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
चतुर्थीचे पाच दिवस सारले असले तरीही आत्तापर्यंत राज्यातील पावसाची आकडेवारी पाहता, धारबांदोडा आणि सांगे या केंद्रांवर पावसाने १५० इंच (इंचाचे दीडशतक) चा आकडा पार केला आहे.
त्याचप्रमाणे, पेडणे, जुने गोवे, साखळी, वाळपई, फोंडा, काणकोण आणि केपे या केंद्रांवरही १०० इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली असून, ही केंद्रे १५० इंचांच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
यंदा मान्सून गोव्यात अंदाजित वेळेच्या सुमारे १२ दिवस आधीच दाखल झाला होता. सुरुवातीला काही दिवस चांगला पाऊस झाल्यानंतर मध्येच त्याने मोठी विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या अलर्टमुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून, सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.