Goa Crime: स्टेशनवर महिलांना लुबाडले, रेल्वेतून दारू तस्करी; पनवेलच्या संशयितावर महाराष्ट्र, कर्नाटकातही गुन्हे नोंद

Goa Crime News: रेल्वे स्थानकावर महिलांना एकटे गाठून त्यांना लुबाडणारा अशोक घरत (५०) याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून, तो रेल्वेतून दारू तस्करीही करीत होता, असे पोलिस तपासात आढळून आले आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: रेल्वे स्थानकावर  महिलांना एकटे गाठून त्यांना लुबाडणारा अशोक घरत (५०) याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून, तो रेल्वेतून दारू तस्करीही करीत होता, असे पोलिस तपासात आढळून आले आहे. त्याच्याविरुद्ध दारू तस्करीचे महाराष्ट्र व कर्नाटकात प्रत्येकी दोन गुन्हे नोंद आहेत.

४ सप्टेंबर रोजी या संशयिताला कोकण रेल्वे पोलिसांनी वास्को येथील फिलोमिना रॉड्रिग्स (५९) या महिलेच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याप्रकरणी  कोकण रेल्वे पोलिसांनी अटक केली होती.

चोरीची वरील घटना ३१ ऑगस्ट रोजी मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर घडली होती. सध्या हा संशयित न्यायालयीन कोठडीत आहे. अशोक हा  महाराष्ट्रातील पनवेल येथील आहे.

Crime News
Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

रेल्वे  प्रवासात व स्थानकावर एकट्या महिलांना हेरून तो त्याचे सुवर्णलंकार चोरून नेत होता. पोलिसांनी त्याला अटक करून कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. २०२० साली कोविडमुळे पत्नी, एक मुलगा आणि मुलगी वारली. त्यानंतर दुसरा विवाह केला. मात्र, त्या पत्नीने घटस्फोट दिला, असे त्याने पोलिसांना सांगितले.

Crime News
Kolkata Crime: कोलकाता पुन्हा हादरलं! बर्थ डे पार्टीतच 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; मित्रच ठरले कर्दनकाळ

लवकरच आरोपपत्र

कोकण रेल्वे पोलिसांनी अशोक याच्यावर  भारतीय न्याय संहितेच्या ३०३ (२), ३०४ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत वेळीप पुढील तपास करीत आहेत. लवकरच  संशयितावर  न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com