वास्को ते होस्पेट पर्यंत Goa Railway Double Track कामाला वेगाने सुरुवात

वास्को उडी बेलाबाय रेल्वे रुळाच्या बाजूस मातीच्या चाचणीचे काम सुरु (Goa Railway Double Track)
Goa Railway Double Track: वास्को उडी बेलाबाय रेल्वे दुपदरीकरणासाठी माती चाचणीचे काम सुरू असताना.
Goa Railway Double Track: वास्को उडी बेलाबाय रेल्वे दुपदरीकरणासाठी माती चाचणीचे काम सुरू असताना.Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Railway Double Track: दक्षिण - पश्चिम रेल्वे प्राधिकरणातर्फे (South-Western Railway Authority) वास्को मुरगाव बंदर ते होस्पेट (Vasco Mormugoa To Hospet) पर्यंत रेल्वे दुपदरीकरणाच्या (Railway Double Track) कामाला वेगाने सुरुवात. वास्को उडी बेलाबाय रेल्वे रुळाच्या बाजूस मातीच्या चाचणीचे (Soil Test) काम रेल्वे प्राधिकरणाने हाती घेतले असून लवकरच रेल्वे रुळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. केंद्रीय रेल्वे प्राधिकरणातर्फे दक्षिण गोव्यातील रेल्वे रुळाचे विस्तारीकरण करून मुरगाव बंदर ते हॉस्पेटपर्यंत रेल्वे दुपदरीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयातर्फे (Union Railway Ministry) देशांतर्गत रेल्वेची सेवा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक राज्यात रेल्वे दुपदरीकरणाबरोबर रेल्वेच्या विस्तारीकरणाचे काम सर्वत्र सुरू आहे. मुरगाव बंदर ते होस्पेट पर्यंत रेल्वे दुपदरीकरण्याच्या कामाने वास्को, शांतीनगर, दाबोळी व इतर भागात युद्धपातळीवर सुरू आहे.

Goa Railway Double Track: वास्को उडी बेलाबाय रेल्वे दुपदरीकरणासाठी माती चाचणीचे काम सुरू असताना.
Goa Tourism: कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना राज्यात प्रवेश मिळणार

दरम्यान मुरगाव बंदर ते हॉस्पेटपर्यंत रेल्वे दुपदरीकरणाला गोव्यातील काही बिगर सरकारी संस्था, पर्यावरणप्रेमी विरोध करीत असल्याने मुरगाव तालुक्यातील काही भागात रेल्वेचे काम संथ गतीने सुरु आहे. कारण रेल्वे दुपदरीकरणामुळे कासावली, वेलसाव व इतर ठिकाणी रेल्वेच्या विस्तारीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येईल. तसेच काही भागात रेल्वे दुपदरीकरणामुळे घरांना धोका निर्माण होणार असल्याने कासावली भागात काही दिवसांपूर्वी आंदोलन छेडण्यात आले होते. रेल्वेचे दुपदरीकरण या विरोधात सध्या मुरगाव तालुक्यातील उपजिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सध्या सुरू आहे. वास्को, उडी, बेलाबाय येथे रेल्वे रुळाच्या बाजूस रेल्वे प्राधिकरणातर्फे मातीची चाचणी घेण्याचे काम सुरू आहे. लवकरच येथून रेल्वे दुपदरीकरणाबरोबर विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू होणार आहे.

Goa Railway Double Track: वास्को उडी बेलाबाय रेल्वे दुपदरीकरणासाठी माती चाचणीचे काम सुरू असताना.
Goa: सार्वजनिक गटारामध्ये सांडपाणी सोडणाऱ्या प्रवर्तकाविरोधात तक्रार

" कोळसा मुरगाव बंदरात वाढण्याची शक्यता"

गेल्या आठवड्यात मुरगाव पत्तन्यास एम पी टीमध्ये धक्का क्रमांक ५, ६ वरील कोळशाची तपासणी करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आले होते. त्याने आपल्या तपासणीत कोणता अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असावा. प्राप्त माहितीनुसार मुरगाव बंदरात कोळसा वाढण्याची शक्यता सर्व स्थरातून बोलण्यात येत आहे. मुरगाव बंदर ते होस्पेटपर्यंत होणारी रेल्वे दुपदरीकरण सुद्धा याचा भाग असण्याची शक्यता मुरगाव भागातील समाजसेवक तथा गोवा फर्स्टचे निमंत्रक परशुराम सोनुर्लेकर यांनी व्यक्त केली. कोळसा वाढवण्यासाठी केंद्र सरकार बरोबर राज्य सरकारचा महत्त्वाचा वाटा असल्याची माहिती सोनुर्लेकर यांनी दिली. रेल्वे दुपदरीकरणामुळे दक्षिण गोवा कोळशाचा हब होणार आहे. केंद्र सरकार फक्त उद्योगपतीच्या इशाऱ्यावर जनतेला प्रदूषणाच्या विळख्यात टाकत आहे. मुरगाव, वास्कोवासीय प्रदूषणाने हैराण झाले असून आता अदानी, जिंदालची नजर संपूर्ण दक्षिण गोव्यावर असल्याची माहिती सोनुर्लेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com