Contract Workers: गोव्यातील 2 हजारांहून अधिक कंत्राटी कामगार होणार कायम? 'साबांखा'कडून नियमितीकरणाचे आश्वासन

Goa PWD Contract Workers Regularization: आश्वासनाची पूर्तता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी करावी, अशी मागणी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसच्या (इंटक) वतीने करण्यात आली.
Goa PWD Contract Workers Regularization
Contract WorkersDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये (साबांखा) २०२१ पर्यंत रोजंदारीवर असलेल्या दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे आश्वासन खात्याचे प्रशासकीय संचालक परेश फळदेसाई यांनी सोमवारी दिले.

या आश्वासनाची पूर्तता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी करावी, अशी मागणी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसच्या (इंटक) वतीने करण्यात आली. साबांखात रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) सतत आवाज उठवत आली आहे. सोमवारी आल्तिनो येथील साबांखा खात्याच्या मुख्यालयाबाहेर इंटकचे राज्याध्यक्ष ॲड. अजय प्रभुगावकर यांनी आंदोलन केले.

Goa PWD Contract Workers Regularization
BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचा दोन दिवसीय दौरा!

त्यांनी शिष्टमंडळासह खात्याचे प्रशासकीय संचालक परेश फळदेसाई यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत फळदेसाई यांनी राज्य सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याची अधिसूचना काढली असून, या कर्मचाऱ्यांनाही कायमस्वरूपी करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि काही कालावधीत ती पूर्ण होईल, असे उपस्थितांना सांगितले.

फळदेसाई यांनी दिलेल्या आश्वासनाचे ॲड. प्रभुगावकर यांनी स्वागत केले. यापूर्वी कंत्राटी कामगार न्यायालयात गेले होते, त्यांना त्याचा फायदा झाला आहे. परंतु, न्यायालयात गेले नाहीत असे दोन हजारांहून अधिक कंत्राटी कामगार आहेत. त्यांना या अधिसूचनेचा फायदा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com