Solar Ferryboat : ‘सौर फेरीबोट’ खरेदी ‘मिशन टोटल कमिशन’साठी; काँग्रेसचा आरोप

Goa Ferryboat : ढवळीकर-फळदेसाईंनी कमिशन परत करावे
 Ferryboat Goa
Ferryboat GoaDainik Gomantak

SolarFerryboat :

पणजी, राज्य सरकारने सुमारे चार कोटी रुपये खर्चून खरेदी केलेली ‘सौर फेरीबोटी’चा वापर होत नसल्याने ती ‘अव्यवहार्य’ असल्याचे नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी जाहीर केले आहे, त्यामुळे राज्य सरकारने हा उपक्रमही ‘मिशन टोटल कमिशन’ साठीच राबविला होता.

या सौर फेरीबोटीवर मिळालेली कमिशनची रक्कम तत्कालीन मंत्री ​​सुदिन ढवळीकर आणि मंत्री फळदेसाई यांनी परत करावी, असा टोला काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी लगावला आहे.

काँग्रेस भवनात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी उत्तर गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर व सांताक्रूझ गट अध्यक्ष जॉन नाझारेथ यांची उपस्थिती होती.

 Ferryboat Goa
Indian Army: देशात नवं सरकार स्थापन होताच लष्कराची ताकद वाढणार; K-9 वज्र ऑटोमॅटिक हॉवित्झर सारख्या सौद्यांना मिळणार मंजूरी!

बंदर कप्तानने सरकारी ‘नोट’मध्ये सौर फेरीबोट राज्याला परवडणारी नाही, असे स्पष्ट नमूद केलेले असतानाही केवळ कमिशन खाण्यासाठी राज्य सरकारने ती खरेदी केल्याचा आरोप पणजीकर यांनी केला. ढवळीकर यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये सौर फेरीबोटींच्या व्यवहार्यतेची पाहणी केरळला जाऊन केली होती.

त्या शिष्टमंडळाने तयार केलेल्या अहवालातही सौर फेरीबोट उपयुक्त नसल्याचे नमूद केले होते. तसेच राज्यातील पाण्याच्या प्रवाहाला असणारी गती, वारंवार होणारे हवामान बदल याचा सौर फेरीबोटीवर प्रतिकूल परिणाम होणार असल्याने त्याअनुषंगाने तज्ज्ञांनी अभ्यास करावा, असेही अहवालात म्हटल्याचा दावा पणजीकर यांनी केला.

 Ferryboat Goa
Goa Todays Update: जीएसटी कौन्सिलच्या कायमस्वरुपी सदस्यपदावरुन मॉविन गुदिन्हो यांची उचलबांगडी

‘सरकारची कृती सार्वजनिक करावी’

नदी परिवहन मंत्री फळदेसाई यांच्या कार्यकाळात केंद्रीय जलमार्गमंत्री सर्बानंद सोनवाल यांच्या हस्ते ऑक्टोबर २०२२ मध्ये सौर फेरीबोटीचे उद्‍घाटन करण्यात आले.

भाजप सरकारने केरळमध्ये गेलेल्या शिष्टमंडळाच्या अहवालातील नोंदींवर काय कृती केली ती सार्वजनिक करण्याची मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली. मागील अकरा वर्षांत आणलेले अनेक प्रकल्प एकतर पांढरे हत्ती ठरले आहेत किंवा ते प्रत्यक्षात आलेच नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com