Supermoon: वर्षाच्या शेवटच्या 'सुपरमून'च्या दर्शनासाठी गर्दी, अवकाशाबद्दल कुतूहल वाढते आहे..

Goa public astronomy observatory: परवाची पौर्णिमा या वर्षाच्या शेवटच्या 'सुपरमून'चे दर्शन घडवणारी होती. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून ही वर्षाची शेवटची मोठी घटना होती.
Goa public astronomy observatory
Goa public astronomy observatoryDainik Gomatnak
Published on
Updated on

परवाची पौर्णिमा या वर्षाच्या शेवटच्या 'सुपरमून'चे दर्शन घडवणारी होती. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून ही वर्षाची शेवटची मोठी घटना होती. सार्वजनिक खगोलशास्त्रीय वेधशाळेने या निमित्ताने ठिकठिकाणी आयोजित केलेल्या चंद्र निरीक्षणाला जो उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला त्यातून एक गोष्ट जाणवली की 'असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ एस्ट्रॉनॉमी' या संस्थेच्या 43 वर्षाच्या कामाला आता लोकांची मान्यता मिळत आहे.

लोकांना आता ठाऊक झालेले आहे की जेव्हा अशा प्रकारची आगळी घटना अवकाशात घडते तेव्हा तिचे अवलोकन करायला आपण नेमके कुठे जायला हवे. पणजी शहरातील जुन्ता हाऊस इमारतीत स्थापन झालेल्या वेधशाळेने आपली तशी सन्मानजनक ओळख नक्कीच निर्माण करून ठेवली आहे. 

जुन्ता हाऊस इमारत आता काळाच्या आड जाणार आहे. या इमारतीच्या गच्चीवर असलेल्या सार्वजनिक खगोलशास्त्रीय वेधशाळेचे भविष्य पुढील काळात नेमके काय असेल याबद्दलही लोकांच्या मनात बेचैनी आहे.

हे देखील एक कारण आहे की सध्या वेधशाळेत आयोजित होणाऱ्या अवकाश निरीक्षण कार्यक्रमांना लोकांची हजेरी वाढू लागली आहे. एकेकाळी या वेधशाळेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आवडीपोटी अवकाश निरीक्षणविषयक उपक्रम चालवले होते,

मात्र आता लोकांच्या उत्स्फूर्त सहभागाने अवकाश निरीक्षण कार्यक्रम ही 'चळवळ' बनून गेली आहे. अवकाशात एखादी घटना, उदाहरणार्थ उल्का वर्षाव, घडायची बातमी कानावर येताच या वेधशाळेच्या कार्यकर्त्यांना लोकांचे फोन येण्यास सुरुवात होते.

एकेकाळी विद्यार्थी किंवा खगोलशास्त्रात रस असलेले लोकच अवकाश निरीक्षणात सामील असायचे मात्र आता इतर क्षेत्रातील लोकही अवकाशाकडे कुतूहलाने पाहू लागले आहेत. लहानपणी खगोलशास्त्रात गोडी असलेले, मात्र पुढे विशिष्ट कारणांमुळे इतर क्षेत्रात काम करू लागलेले लोक निवृत्तीनंतर पुन्हा वेधशाळेकडे येताना दिसतात.

खगोलशास्त्राबद्दल एक उत्सुकतेचे वातावरण गोव्यात तयार झालेले आहे. अशाप्रकारे लोकांमध्ये विश्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम या वेधशाळेने केले आहे. फक्त पणजीतच नव्हे तर गोव्यातील म्हापसा, वास्को, मडगाव, पर्वरी या वेधशाळेच्या इतर केंद्रावरसुद्धा अवकाश निरीक्षणासाठी लोक आवर्जून हजेरी लावताना दिसत आहेत.

Goa public astronomy observatory
Supermoon 2025: चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ, दुर्बिणी-टेलीस्कोपचीही गरज नाही; कुठे आणि कसा पाहाल हा 'दुर्मिळ क्षण'?

महत्वाची बाब ही आहे की या अशा प्रकारच्या उपक्रमातून एकप्रकारे आपोआपच विज्ञानाचा प्रसार देखील होत राहतो. खगोलशास्त्राबद्दल किंवा आकाशातील ग्रह-ताऱ्यांबद्दल अनेक गैरसमजुती आणि अंधविश्वास आपल्या समाजात आहे. या गैरसमजुती किंवा अंधविश्वास वेधशाळेच्या कार्यामुळे दूर व्हायला मदत झाली आहे- लोकांना विज्ञानाकडे नेण्यासाठी ही वेधशाळा कारणीभूत ठरली आहे.

भारतात अवकाश शास्त्राने खूप मोठी झेप घेतली आहे. देशाच्या अवकाश विषयक विकासाकडे लोकांना जुळवण्याचे कामही, विविध उपक्रमांच्या अनुषंगाने ही वेधशाळेने करत आली आहे.

Goa public astronomy observatory
Isro Satellite Launch: इस्रोनं रचला नवा विक्रम! सर्वात वजनदार 'CMS-03' उपग्रह यशस्वीरित्या लॉन्च, भारतीय नौदलाची ताकद वाढणार Watch Video

इस्त्रोसारखी संस्था आखत असलेल्या विविध अवकाशविषयक योजनांचा देशाला, समाजाला नेमका लाभ होणार आहे हे अशा प्रकारच्या उपक्रमातून सामान्य लोकांना समजावून सांगणे शक्य होते. एखाद्या 'क्रुसेड'सारखे हे काम वेधशाळेच्या कार्यकर्त्यांनी सुरू ठेवले आहे. 

सार्वजनिक खगोलशास्त्रीय वेधशाळा आता सर्वपरिचित बनली आहे. वेधशाळा असलेली जुन्ता हाऊस इमारत आता पाडली जाणार आहे.‌ अशावेळी वेधशाळेसाठी नवीन जागा किंवा तिचे भवितव्य ठरवण्याच्या दृष्टीने जेव्हा वेधशाळेचे कार्यकर्ते शासकीय कार्यालयात जातात तेव्हा तिथे त्यांना ज्याप्रकारे सन्मानपूर्वक वागवले जाते तो या कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक योगदानाला मिळालेला प्रतिसाद असतो. वेधशाळेचे काम चालू राहायला हवे ही भावना तिथे स्पष्टपणे दिसते.‌

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com