GFA Professional League: 'फिक्सिंग' रोखण्यासाठी GFA आग्रही; समितीनेही दिला कडक इशारा

गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेला 6 डिसेंबरपासून सुरवात
GFA League
GFA LeagueDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा फुटबॉल असोसिएशन (GFA) प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेला मागील तीन मोसमध्ये ‘मॅच फिक्सिंग’ च्या संशयाने ग्रासले होते. यातील काही सामन्यांचे निकाल अद्याप आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. याबाबतीत फिफा, आशियाई फुटबॉल महासंघाच्या नैतिकता समितीनेही कडक इशारा दिला आहे. तसेच निकाल निश्चितीची किड रोखण्यासाठी जीएफए प्राधान्य देणार आहे.

(Goa Professional League Football Tournament start from 6th December)

जीएफए गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेला 6 डिसेंबरपासून सुरवात होईल. त्यापूर्वी मॅच फिक्सिंग रोखण्याच्या अनुषंगाने सर्व सहभागी संघ व संबंधितांसाठी कार्यशाळा घेण्यात येईल. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) नैतिकता अधिकारी खास मार्गदर्शन करतील.

जीएफए स्वतःचा नैतिकता अधिकारी नियुक्त करेल. यासंदर्भात माजी पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती जीएफए उपाध्यक्ष जोनाथन डिसोझा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेतील सर्व सामन्यांवर लक्ष राहील व आयोजनात पारदर्शकता राहील, असेही जोनाथन यांनी नमूद केले. यावेळी जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस, आणखी एक उपाध्यक्ष अँथनी पांगो व सर्व कार्यकारी समिती सदस्य उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत स्पर्धा करंडकाचेही अनावरण झाले.

प्रोफेशनल लीग स्पर्धेत यंदा 11 संघ

प्रोफेशनल लीग स्पर्धेत यंदा एकूण 11 संघांत चुरस असेल. गतविजेता धेंपो स्पोर्टस क्लब, स्पोर्टिंग क्लब द गोवा, साळगावकर एफसी, एफसी गोवा, चर्चिल ब्रदर्स, सेझा फुटबॉल अकादमी, वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लब, गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब, वास्को स्पोर्टस क्लब, पणजी फुटबॉलर्स व कळंगुट असोसिएशन हे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अथवा मार्चच्या प्रारंभी स्पर्धा संपविण्यावर भर राहील, असे जोनाथन यांनी स्पष्ट केले. स्पर्धा दोन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात गुणतक्त्यातील सुरवातीचे सहा संघ विजेतेपदासाठी, तर नंतरचे पाच संघ पदावनती फेरीत खेळतील.

GFA League
Ravindra Jadeja: बांगलादेश दौऱ्यातून रवींद्र जडेजा बाहेर, या खेळाडूला मिळाली संधी

प्रोफेशनल लीग विजेत्या संघाला 2023-24 मधील द्वितीय विभागीय आय-लीग स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. विजेत्या संघाला पाच लाख रुपये, उपविजेत्या संघाला तीन लाख रुपये बक्षीस मिळेल. सामने म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर होतील, असे उपाध्यक्ष अँथनी पांगो यांनी सांगितले.

GFA League
Ethan Vaz Chess Champion: 'राष्ट्रकुल'मध्ये 'सुवर्ण' निशाणा साधणाऱ्या 'एथन'चे गोव्यात जंगी स्वागत

स्पर्धेला पुरस्कर्त्यांचे पाठबळ

यंदा प्रोफेशनल लीग स्पर्धा आयोजनात जीएफएला पुरस्कर्त्यांचे पाठबळ लाभले आहे. सीएएम ग्रुप स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते आहेत. फॅनकोड यांना स्पर्धेचे प्रक्षेपण हक्क देण्यात आले असून सामने थेट प्रक्षेपित केले जातील. प्रक्षेपण करार दोन वर्षांचा आहे. जेटवे आयएसपी स्पर्धेचे इंटरनेट सहयोगी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com