Ethan Vaz Chess Champion: 'राष्ट्रकुल'मध्ये 'सुवर्ण' निशाणा साधणाऱ्या 'एथन'चे गोव्यात जंगी स्वागत

दाबोळी विमानतळावर झाले आगमन
Ethan Vaz
Ethan VazDainik Gomantak

मडगाव: श्रीलंका येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या एथन वाझने सुवर्ण पदक कमावले आहे. 12 वर्षाखालील गटात भारतासाठी खेळताना त्याने हा सुवर्ण वेध साधला आहे. एथन वाझ आज गोव्यात दाखल झाला असून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.

(Ethan Vaz wins gold for India at Commonwealth Chess championship )

Ethan Vaz
Casinos in Mandovi: मांडवीतील कॅसिनो आणि थकीत वीज बिलाबाबत गोवा मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार श्रीलंका येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत 12 वर्षाखालील गटात भारताचे नेतृत्व करणाऱ्या गोव्याच्या एथन वाझने सुवर्ण पदक कमावले आहे. आज दाबोळी विमानतळावर त्याचे आगमन होताच त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.

Ethan Vaz
Goa Crime News: अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणास स्‍थानिकांकडून चोप

वाझच्या स्वागतासाठी कुडतरी भाजप मंडळाचे पदाधिकारी आणि एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा आणि त्यांचे इतर सहकारी होते. यावेळी बोलताना बार्बोजा यांनी म्हटले आहे की, एथन हा आमच्या राय गावचा अभिमान आहे. त्याने केलेल्या या पराक्रमामुळे आम्हा सर्व राय वासियांची छाती गर्वाने फुगली आहे. आता गोव्यातील सर्व युवा खेळाडूंनी वाझ याचा आदर्श घेत आपल्या क्षेत्रात उंच भरारी घ्यावी असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com