President droupadi Murmu Goa: विधानसभेत महिलांच्या सहभागाबद्दल राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता, नेत्यांचेही कान टोचले

लोकप्रतिनिधींचे सभागृहातील वर्तन सभ्य असावे!
Droupadi Murmu
Droupadi Murmu Dainik Gomantak

President Murmu Goa Assembly विधानसभेतील महिलांची अत्यल्प संख्या आणि सार्वजनिक जीवनातील महिलांची कमी टक्केवारी, ही गोव्यासारख्या राज्याला शोभा देणारी नाही, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज विधानसभेत राजकीय नेत्यांसह उपस्थित सर्वांचेच कान टोचले. ही स्थिती पालटली पाहिजे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रपतींनी विधानसभा सदस्यांना खास अधिवेशनात संबोधित केले. यावेळी प्रेक्षागृहात विविध नगराध्यक्ष, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंचायत सदस्य उपस्थित होते.

राष्ट्रपती म्हणाल्या की, विविध धर्म, आस्था आणि पंथांचे पालन करतानाच, ‘एक गोवा’ आणि ‘एक भारत’ असे मानणाऱ्या लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना मला आनंद होत आहे.

गोव्याच्या नागरिकांमध्ये भारताशी एकरूप असल्याचा विश्वास कायम आहे. मुक्तीशिवाय भारताचे स्वातंत्र्यही अपूर्ण होते आणि याच भावनेने देशभरातील लोकांनी गोवा मुक्ती चळवळीत भाग घेतला. राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिक गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढले.

मुक्तीनंतर जन्मलेला मी पहिलाच मुख्यमंत्रीः

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, पंतप्रधानांनी भारत २०४७ साली कसा असावा, यासाठी ‘दृष्टी २०४७’ हा महत्त्वाचा दस्तावेज तयार करणे सुरू केले आहे. त्याच धर्तीवर ‘गोवा २०४७’ हा दस्तावेज राज्य पातळीवर तयार करण्यात येणार आहे.

भौगोलिकदृष्ट्या हे छोटे राज्य असले तरी निसर्गाने भरभरून दिले आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर १५ वर्षांनी जरी मुक्त झाला तरी गोव्याने प्रगती साधली आहे. गोवा मुक्तीनंतर जन्मलेला मी पहिलाच मुख्यमंत्री आहे.

गोवा राज्य अनेक आघाड्यांवर अग्रणी

विकासाच्या विविध मापदंडांचा विचार केला तर अनेक आघाड्यांवर गोवा अग्रणी आहे. या राज्यातील दरडोई ‘जीडीपी’ राष्ट्रीय सरासरीपेक्षा जवळपास अडीच पट जास्त आहे. जल व्यवस्थापन, निर्यात सज्जता, नवोन्मेषी कल्पना, शिक्षण आणि आरोग्य यात गोवा आघाडीच्या राज्यांपैकी एक आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

Droupadi Murmu
Birsa Munda Statue at Goa: परशुरामानंतर आता राज्यात उभारणार बिरसा मुंडा यांचा पुतळा- सावंत

‘श्रमधाम’ योजनेचा सभापतींकडून उल्लेख

सभापती रमेश तवडकर म्हणाले, समानता आणि परस्पर सौहार्द ही गोव्याची ओळख आहे आणि ती टिकवली आहे. राज्यात घरे नसलेल्यांना श्रमधाम योजनेतून घरे बांधून देणे सुरू केले आहे. येथे विविधतेत एकता आहे. सांस्कृतिक विविधता आहे. देशाच्या विकासात गोव्याचाही वाटा असेल.

Droupadi Murmu
Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरामध्ये वाढ; जाणून घ्या आजच्या किंमती...

सरदेसाईंचा कार्यक्रमावर बहिष्कार :

आमदार विजय सरदेसाई यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. ते ट्विटरवर म्हणाले की, राष्ट्रपतींविषयी आदर आहे; पण राज्य सरकारने आयोजिलेल्या कार्यक्रमांपासून दूर राहिलो. कारण राज्यातील आणि दिल्लीतील भाजपने वेळोवेळी गोवा आणि गोमंतकीय यांच्याशी केलेल्या ढोंगीपणाला मी कंटाळलो आहे. आरक्षणाबाबत आदिवासी समाजाचा विश्वासघात केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com