दाबोळी : वास्को (Vasco da Gama) मतदार संघातील (Constituency) काँग्रेस उमेदवारी कोणालाही द्या. पण पूर्वीच्या गट समित्यांना सर्वप्रथम विश्वासात घ्या. अशी मागणी माजी वास्को काँग्रेस गटाध्यक्ष इमरान शेख यांनी केली. तसेच विद्यमान वास्को काँग्रेस गट समितीने पूर्वीच्या समितीनासुद्धा विश्वासात घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याची माहिती माजी गटाध्यक्ष शेख यांनी केली.
वास्को काँग्रेस गट समिती पूर्वीच्या गट समित्यांना विश्वासात न घेता आपली मनमानी करीत असल्याचा आरोप माजी वास्को काँग्रेस गटाध्यक्ष इमरान शेख यांनी वास्को बायणा आयोजित पत्रकार परिषदेतून केला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी वास्को काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष श्रीमती मांजरेकर, मोहम्मद रफी अंगाडी उपस्थित होते. पुढे पत्रकारांना माहिती देताना माजी गटाध्यक्ष इमरान शेख म्हणाले की गोवा प्रदेश काँग्रेस समितीने पूर्वीची वास्को काँग्रेस गट समिती कार्यकाळ संपल्यामुळे बरखास्त केली होती.
पण नवीन समितीची नेमणूक करताना पूर्वीच्या गट समितीला काँग्रेस समितीने विश्वासात घेतले नसल्याची माहिती इमरान शेख यांनी दिली. विद्यमान वास्को काँग्रेस समिती आपल्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून पूर्वीच्या काँग्रेस गट समितीवर अन्याय करीत असल्याचा आरोप शेख यांनी केला. यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस समितीने पुढाकार घेऊन यावर योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी इमरान शेख यांनी केली.
माजी गटाध्यक्ष इम्रान शेख यांनी सांगितले की आम्ही पूर्णपणे काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते असून पक्ष जो निर्णय घेईल त्याचे आम्ही समर्थन करणार आहे. येणाऱ्या गोवा विधानसभेसाठी मतदार संघातून गोवा प्रदेश काँग्रेस समिती तर्फे देणाऱ्या उमेदवाराला माजी काँग्रेस समिती पूर्णपणे सहकार्य करणार असल्याची माहिती इमरान शेख यांनी दिली.
माजी उपाध्यक्ष श्रीमती मांजरेकर म्हणाल्या की विद्यमान वास्को काँग्रेस गट समिती पूर्वीच्या समितीला विश्वासात न घेता कार्य करीत आहे. हे एकदम चुकीचे आहे. पक्षाचे कार्य गेल्या तीस वर्षापासून निस्वार्थीपणे केले आहे. यासाठी गोवा काँग्रेस (Goa Congress) समितीने वास्कोतील (Vasco da Gama) पूर्वीच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन आम्हाला येणाऱ्या विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाचा चांगला उमेदवार द्यावा अशी मागणी मांद्रेकर यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.