समुद्राची घुसखोरी, नदीचे दुभंगलेले मुख ‘जैसे थे’!

‘तौक्ते’नंतर गालजीबाग किनारा सावरलाच नाही
समुद्राची घुसखोरी, नदीचे दुभंगलेले मुख ‘जैसे थे’!
समुद्राची घुसखोरी, नदीचे दुभंगलेले मुख ‘जैसे थे’!Dainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: गालजीबाग (Galgibaga) किनाऱ्याची तौक्ते (Cyclone Tauktae) वादळामुळे झालेली दुरवस्था अद्याप कायम आहे. या वादळामुळे किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात झीज होऊन किनाऱ्यावरील (Beaches) पन्नासपेक्षा जास्त सुरूची झाडे (Tree) उन्मळून पडली होती. समुद्र सुमारे वीस मीटर आत शिरला होता. ती परिस्थिती अद्याप कायम आहे. तसेच सुमारे शंभर मीटर किनाऱ्यावरील (Beaches) झाडे (Tree) वाहून गेली.

समुद्राच्या (Sea) पाण्याची पातळी वाढून गालजीबाग नदीचा (Galgibaga River) बांध फोडून समुद्र नदीपात्रात घुसल्याने नदीचे (River) मुख दुभंगले आहे. ते अद्याप तसेच आहे. गालजीबाग नदीच्या (River) तटावर दहा पेक्षा जास्त घरे आहेत. त्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात वनखात्याच्या वनविभागाचे क्षेत्रिय वनाधिकाऱ्यांनी सरकारला (Government) अहवाल सादर केला होता. मात्र, अद्याप कोणतीच कार्यवाही केली नाही. किनाऱ्याची वाढती धूप, उद्‍ध्‍वस्‍त होणारे सुरूचे बन, नदीचा प्रवाह याबाबत सरकारने उपाययोजना न केल्‍यास ते धोकदायक ठरू शकते.

कासव संरक्षण कक्षही संकटात

या किनाऱ्यावर जीवरक्षकांचा मनोरा आहे. त्यालाही धोका निर्माण झाला होता. हा किनारा सागरी कासवासाठी (Tortoise) आरक्षित केला आहे. दरवर्षी सागरी कासव अंडी (Egg) घालण्यासाठी या किनाऱ्यावर (Beach) येतात त्याच्या संरक्षणासाठी या ठिकाणी वनखात्याने टेहाळणी कक्ष उभारला होता. तो कक्ष व किनाऱ्यावर सागरी कासवांची घरटी वाहून गेली. यंदा वनखात्याने किनाऱ्यावर वरच्या बाजूला टेहाळणी कक्ष उभारला आहे.

समुद्राची घुसखोरी, नदीचे दुभंगलेले मुख ‘जैसे थे’!
गोव्यात वातावरण बदलाचा फटका! समुद्री कासवांचे आगमन लांबणीवर

या किनाऱ्यावर (Beach) पन्नास वर्षांपूर्वी सुरूच्या झाडांची (Tree) लागवड केली होती. मात्र, त्या वृक्षांची पावसाळ्यात (Rainy Season) पडझड होते. वनखात्याने आतापर्यंत लागवड करण्याचा प्रयत्न केला नाही. या किनाऱ्यालगत सागरी कासव संवर्धन प्रकल्प उभारण्यासाठी वनखात्याने (Forest Department) हजारो चौ.मी. जमीन संपादन केली आहे. मात्र, या जमिनीभोवती लाकडी कुंपण (Wooden Fence) उभारण्यापलीकडे वन खात्याने कोणताच विकास केला नाही.

-रूद्रेश नमशीकर, तळपणचे पंचसदस्‍य.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com