Goa Congress : दुरावलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी पक्षाची मोहीम : अमित पाटकर

तक्रारी, सूचना मांडण्याचे आवाहन
Amit Patkar
Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress : पक्षापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी सूचना किंवा ज्या तक्रारी आहेत, त्या मांडण्यासाठी पक्षातर्फे मोबाईल क्रमांक जाहीर केला आहे. त्याशिवाय ई-मेल आयडीवरही त्या पाठविता येतील, असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

काँग्रेसला बळकटी देण्यासाठी ''हात से हात जोडो'' मोहिमेला जोडूनच ही मोहीम राबविली जाणार आसल्याचे त्यांनी नमूद केले.

Amit Patkar
Goa Medical College : 'जीएमसी’त नवे 4 एमडी अभ्यासक्रम

पाटकर म्हणाले, कार्यकर्ते आणि जनतेकडून मिळणाऱ्या सूचना विचारात घेऊनच प्रदेश काँग्रेस पुढील वाटचाल करेल. गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे काहीजण पक्षापासून दूर गेले आहेत.

प्रामाणिक कार्यकर्ते पक्षासोबत आहेत. या सर्वांना आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत एकत्र आणून पुन्हा पक्षाला बळकट करायचे आहे. त्यासाठीच त्यांच्याकडून तसेच काँग्रेसच्या प्रामाणिक मतदारांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत, असे पाटकर म्हणाले.

भाजप सरकारची नीती आणि भ्रष्ट राजकारण गोव्यातील जनतेला मान्य नाही. त्यांना आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काँग्रेसची गरज भासत आहे.

काँग्रेसच आपल्याला न्याय मिळवून देईल, असा विश्वास जनतेला आहे. त्यामुळेच जनतेकडूनही सूचना मागविल्या आहेत. पक्षापासून दुरावलेल्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी आपापल्या सूचना पक्षाकडे मांडाव्यात. पक्षाने जाहीर केलेला क्रमांक असा : 911270009 हा संपर्क क्रमांक आणि feedback.goacongress@gmail.com हा ईमेल आयडी जारी केलेला आहे.

Amit Patkar
Rahul Gandhi New Look: अखेर राहुल गांधींनी दाढी काढली, सुटा-बुटातील नवा लुक व्हायरल

भाजपकडून सूडाचे राजकारण

साखळी नगराध्यक्ष राजेश सावळ यांच्या पोलिस तक्रारीवर अद्याप काहीही हालचाल झालेली नाही. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीची पणजीतून सांगेला बदली करण्यात आली तरीही काँग्रेस गप्प कशी? असा सवाल विचारल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले, यापूर्वी भाजपकडून वाळपईच्या एका कार्यकर्त्याबाबत असे घडले आहे. भाजप आत्तापर्यंत असेच वागत आले आहे. त्यावर काय बोलणार?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com