दैनिक गोमन्तक डिजिटल
पावसाळ्यात मेथी, पालक, कोबी यांसारख्या पालेभाज्यांवर कीटक, अळ्या आणि बॅक्टेरिया वाढण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे या ऋतूत पालेभाज्या खाणे टाळलेलेच बरे.
रस्त्यावरील उघड्या अन्नपदार्थांवर माश्या बसतात. तसेच पाणीपुरी किंवा चाटसाठी वापरले जाणारे पाणी दूषित असण्याची शक्यता असते, ज्यामुळे कावीळ आणि टायफॉइडचा धोका वाढतो.
पाऊस पडू लागला की भजी खाण्याची तीव्र इच्छा होते. मात्र, पावसाळ्यात आपली पचनसंस्था मंदावलेली असते. जास्त तेलकट खाल्ल्याने अपचन आणि ॲसिडिटीच्या समस्या वाढतात.
पावसाळा हा माशांचा प्रजननाचा (Breeding Season) काळ असतो. या काळात विहिरी आणि समुद्राचे पाणी दूषित असते, ज्यामुळे सी-फूड खाल्ल्याने पोटाचे गंभीर इन्फेक्शन होऊ शकते.
हॉटेल किंवा रस्त्यावर आधीच कापून ठेवलेली फळे आणि कच्चे सॅलड खाऊ नका. उघड्यावर राहिलेल्या फळांवर जंतू संसर्ग वेगाने होतो. नेहमी घरी आणलेली ताजी फळेच स्वच्छ धुवून खावीत.
पावसाळ्यात शरीराची पचनशक्ती आणि तापमान आधीच कमी असते. अशात थंड पेये, कोल्ड ड्रिंक्स किंवा बर्फाचे गोळे खाल्ल्याने घसा खवखवणे, सर्दी, खोकला आणि ताप येण्याचा धोका वाढतो.
मशरूम दमट आणि ओलसर जागी उगवतात. पावसाळ्यात मशरूमवर बॅक्टेरिया आणि बुरशी (Fungus) येण्याचा धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळे पावसाळ्यात मशरूम खाणे टाळणे सुरक्षित मानले जाते.