Goa Assembly 2025: पोस्टमन पदांसाठी आता 'कोकणी' बंधनकारक; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Goa Postman Jobs Konkani Requirement: गोव्यात पोस्टमन पदांसाठी आता कोकणी बंधनकारक असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे.
Goa Assembly 2025
Goa Assembly 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी: गोव्यात पोस्टमन पदांसाठी आता कोकणी बंधनकारक असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. याबाबत लवकरच परिपत्रक काढलं जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी मंगळवारी (२५ मार्च) सभागृहात दिली.

प्रमोद सावंत यांनी राज्यातील आगामी पोस्टमन भरती प्रक्रियेत कोंकणी भाषेचं ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या पुढील पोस्टमन पदाच्या भरतीसाठी कोंकणी भाषा येणं सक्तीचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केलं आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी कागदपत्रं मुख्यतः पोस्टाच्या माध्यमातून मिळतात. मात्र, स्थानिक कोकणी भाषेचं ज्ञान नसलेल्या पोस्टमनमुळं अनेक वेळा पत्रं आणि शासकीय कागदपत्रं वेळेवर पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

Goa Assembly 2025
Goa Crime: दक्षिण गोव्यात 2 महिन्यात 6 लैंगिक अत्याचाराच्या घटना! वासनांधांकडून  होतेय कोवळ्या मुलींचे शोषण

स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी

वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आगामी पोस्टमन भरती प्रक्रियेत कोंकणी भाषेचं ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील नागरिकांसाठी विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील टपाल सेवा अधिक वेगवान होईल, तसंच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. विशेषतः ग्रामीण भागात, जिथे कोंकणी ही मुख्य भाषा आहे, त्या ठिकाणी हा निर्णय अधिक उपयुक्त ठरणार आहे.

Goa Assembly 2025
Goa Assembly: धार्मिक भावना भडकावणाऱ्या घटना घडत आहेत ही दुःखद बाब! म्हापसा 'बीफ' प्रकरणावरती फेरेरांनी वेधले लक्ष

स्थानिक कोकणी भाषेचा वापर वाढवणे आणि सरकारी सेवांची कार्यक्षमता सुधारणे, या दोन्ही उद्दिष्टांना चालना देणारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com