Porvorim-Sangolda Highway: सहापदरी कॉरिडोरचे काम डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता

काम पूर्ण होण्यासाठी 60 महिन्यांचा कालावधी लागणार, वाहनचालकांना होणार त्रास
Porvorim-Sangolda Highway
Porvorim-Sangolda HighwayDainik Gomantak

Porvorim-Sangolda Highway राष्ट्रीय महामार्ग 66 वरील पर्वरी ते सांगोल्डा अशा रखडलेल्या सहापदरी कॉरिडोरचे काम डिसेंबरपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे वाहतूक आराखडा करताना सार्वजनिक बांधकाम खात्याला बगल रस्त्याचा वापर करण्यावर भर द्यावा लागणार आहे.

त्याशिवाय हे काम पूर्ण करण्याची मुदत जरी २४ महिन्यांची म्हटली असली, तरी त्यासाठी ४८ ते ६० महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता खुद्द सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना वरील कालावधीत त्रास सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चोगम रोडवरील सपना हॅबिटॅट कॉम्प्लेक्सजवळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीची जागा आहे, तेथून बगलमार्ग सुरू करण्याचा सार्वजनिक बांधकाम खात्याचा विचार आहे.

सध्या म्हापसा ते पर्वरी वाहतूक दोन मार्गाने चालते आणि सांगोल्डा येथून ये-जा करण्यासाठी रहदारीसाठी आणखी दोन मार्ग उपलब्ध आहेत, परंतु एकदा बांधकाम सुरू झाल्यानंतर फक्त दोन मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध असतील.

त्या मार्गाने म्हापसा ते पर्वरी, तसेच सांगोल्डा ते पर्वरी अशी वाहतूक होईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रास सांगितले आहे.

पत्रादेवी ते बांबोळीपर्यंतच्या महामार्ग निर्मितीच्या कामातील पर्वरी येथील रुंदीकरणाचे शेवटचे काम असणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पत्रादेवी ते थेट काणकोण (पोळे) अशी वाहतूक सुरळीत होणार आहे.

Porvorim-Sangolda Highway
Goa Monsoon 2023: गोव्यावर मान्सून नाराज? गणेशोत्सवही कोरडाच जाण्याची शक्यता

प्रकल्पासाठी ६४१.४ कोटी रुपये मंजूर

  • या प्रकल्पासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्गासाठी एकूण ६४१.४ कोटी रुपये मंजूर

  • महामार्गासाठी संपादित जमिनीवरील अतिक्रमणे हटविली असून उर्वरित अतिक्रमणे लवकरच हटवणार

  • संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी किमान चार ते पाच वर्षांचा लागणार कालावधी

  • प्रवासी व वाहनधारकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

  • वाहतूक व्यवस्थापन आराखडा करताना सार्वजनिक बांधकाम खात्याची लागणार कसोटी.

  • जनतेला मोठी गैरसोय सहन करावी लागणार.

चोगममार्गे वळविणार वाहतूक

पर्वरी येथे 4,7 किलोमीटर लांबीच्या सहापदरी एलिव्हेटेड हायवे कॉरिडोरच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे. काही दिवसांत त्या निविदा उघडल्या जाणार आहेत.

हायवे कॉरिडॉर पर्वरीच्या जुन्या मार्केटपासून डॉल्फिनच्या सुपरमार्केटपर्यंत निर्माण केला जाणार आहे, हे काम करताना म्हापसा-पर्वरी रस्त्यावरील वाहतूक चोगममार्गे वळवावी लागणार आहे.

Porvorim-Sangolda Highway
PM Vishwakarma Scheme 2023: केंद्राकडून पारंपरिक कारागीर- शिल्पकारांसाठी चतुर्थीची भेट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com