PM Vishwakarma Scheme 2023: केंद्राकडून पारंपरिक कारागीर- शिल्पकारांसाठी चतुर्थीची भेट

विश्‍वकर्मा योजना सुरू : कौशल्यासह आर्थिक सहकार्य
PM Vishwakarma Scheme
PM Vishwakarma Scheme Dainik Gomantak

PM Vishwakarma Scheme 2023 पीएम विश्वकर्मा योजनेमुळे कारागीर आणि शिल्पकारांना प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पणजी येथे आयोजित केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात ते आज बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथे विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी पीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला.

या कार्यक्रमात पीएम विश्वकर्मा बोधचिन्ह, ‘सम्मान,  सामर्थ्य,  समृद्धी’  या घोषवाक्याचे आणि पोर्टलचे पंतप्रधानांनी उदघाटन केले. कस्टमाईज्ड स्टॅम्प शीट आणि टूलकिट बुकलेटचेही पंतप्रधानांनी प्रकाशन केले.

विश्‍वकर्मा योजनेमुळे युवकांच्या कौशल्यात वाढ : श्रीपाद नाईक

‘पीएम विश्वकर्मा’ ही योजना समावेशकतेवर आधारित आहे,  असे नाईक यांनी सांगितले. पारंपरिक व्यवसायातील कारागीर आणि शिल्पकार काही वेळा हा व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यासाठी फारसे उत्सुक नसतात.

मात्र,  पीएम विश्वकर्मा योजना त्यांना हा व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करते, असे प्रतिपादन श्रीपाद नाईक यांनी केले.

पीएम विश्‍वकर्मा योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. विश्‍वकर्मा योजना युवा वर्गाला देखील त्यांच्या पारंपरिक व्यवसायात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देते.

त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले अर्थसाहाय्य मिळवणे सोपे होते आणि त्यांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण मिळवता येते,  अशी माहिती नाईक यांनी दिली. कोणत्याही व्यवसायासाठी भांडवलाची  सर्वांत मोठी आवश्यकता असते असे सांगून पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

देशाची सेवा करत असताना पंतप्रधान मोदी अंत्योदयाच्या सिद्धांताचे अनुसरण करत आहेत, असे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

पंतप्रधान नेहमीच समाजाच्या उपेक्षित घटकांचा विचार करत असतात. पीएम विश्वकर्मा योजना समाजामध्ये कारागिरांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे,  असे तानावडे म्हणाले.

गोव्याचे कृषी,  हस्तकला आणि नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांनी देखील या कार्यक्रमात विचार व्यक्त केले. यावेळी केंद्रीय आणि राज्य सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

PM Vishwakarma Scheme
Goa Accident: गणेशोत्सवाच्या तोंडावर अपघातांचे सत्र, रविवारी चार अपघातात 15 जखमी, एक ठार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com