Porvorim Highway: पर्वरीतील महामार्ग वाहतूक बदलाला ‘ब्रेक’

Goa PWD: निर्णय प्राधिकरणाच्या बैठकीपर्यंत प्रलंबित ठेवण्याचे स्पष्ट केल्याने नियोजित मार्ग बंद राहणार नाही
Goa PWD: निर्णय प्राधिकरणाच्या बैठकीपर्यंत प्रलंबित ठेवण्याचे स्पष्ट केल्याने नियोजित मार्ग बंद राहणार नाही
Highway Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पर्वरी येथे उन्नत महामार्गाचे (एलिव्हेटेड कॉरिडॉर) काम लवकरच सुरू करण्यात येणार असून हे काम जलद गतीने व्हावे, यासाठी येथील वाहतुकीचा दोन ठिकाणचा मार्ग ८ ऑगस्ट ते ७ डिसेंबरपर्यंत वळविण्याची अधिसूचना ‘साबांखा’ने जारी केली होती.

मात्र, यावर साधक-बाधक प्रतिक्रिया उमटल्यावर तूर्तास वाहतूक विभागाने या आठवड्यात मार्गाची चाचणी करून अंतिम निर्णय प्राधिकरणाच्या बैठकीपर्यंत प्रलंबित ठेवण्याचे स्पष्ट केल्याने नियोजित मार्ग बंद राहणार नाही.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १८-९-२०१९ च्या पत्राद्वारे राज्य सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना मार्गाचे काम सुरळीत पार पाडण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.

त्यांना राष्ट्रीय महामार्ग (जमीन आणि वाहतूक) अधिनियम २०२२ अंतर्गत महामार्ग प्रशासक म्हणून जबाबदारी दिली आहे. या आदेशावरून सार्वजनिक बांधकाम खात्याने ही अधिसूचना जारी केली होती.

Goa PWD: निर्णय प्राधिकरणाच्या बैठकीपर्यंत प्रलंबित ठेवण्याचे स्पष्ट केल्याने नियोजित मार्ग बंद राहणार नाही
Porvorim Flyover: पर्वरीतून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, पुढील चार महिने वाहतुकीत मोठा बदल

काय होती पहिली अधिसूचना?

सायरस नर्सरी ते सांगोल्डा जंक्शन या १७५ लांबीच्या महामार्गावरील वाहतूक सर्व्हिस मार्गाने आणि डेल्फिनोजवळील जंक्शन ते हॉटेल मॅजेस्टिक या २२० मीटर मार्गावरील वाहतूक डावीकडील सर्व्हिस मार्गाने वळविण्याची अधिसूचना यापूर्वी ‘साबांखा’ने जारी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com