Porvorim Crime: 'त्या' घटनेचा संपूर्ण व्हिडीओ पोलिसांनी पहावा ', संशयित 'जेसन'ची पत्रकार परिषदेत मागणी

जेसन, जेमिमाचे स्पष्टीकरण : वेटर्स, पर्यटकांविरोधात तक्रार
Porvorim Crime
Porvorim CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Porvorim Crime पर्वरी येथील व्हिवा गोवा हॉटेलमध्ये २० ऑगस्ट रोजी रात्री मारामारीचा जो प्रकार घडला त्याचा खरा व्हिडीओ व्हायरल झाला पाहिजे, अशी मागणी या मारामारीत गुंतल्याचा संशय असलेल्या नावेलीच्या जेसन पिओ फुर्तादो व त्याची मैत्रीण जेमिमा वाझ यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

व्हिवा हॉटेलमधील दोन वेटर्संनी बिअरचे पैसे देऊनही न दिल्याचे कारण सांगून भांडण उरकून काढले व आपल्यावर हल्ला चढवला. त्यात तिथे जे केरळचे पर्यटक होते त्यांनी या वेटर्सना मारामारीत माझ्यावर धक्काबुक्की करण्यात मदत केली.

आपण या दोन्ही वेटर्स तसेच दोन केरळच्या पर्यटकांविरोधात पर्वरी पोलिस स्थानकावर तक्रार नोंदवली आहे. त्याचप्रमाणे या हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी केल्याचे जेसन व जेमिमाने सांगितले.

जो व्हिडीओ व्हायरल झाला तो दुसरा भाग आहे. प्रत्यक्षात मी बिअरचे पैसे देऊन गाडीकडे येत होते तेव्हा वेटरने माझ्यावर हल्ला केला. माझ्यावर हल्ला होत असल्याचे पाहून माझी मैत्रीण जी गाडीमध्ये होती ती सुद्धा मला वाचविण्यासाठी धावून आली.

Porvorim Crime
अपघाताने कुटुंब हिरावलं, पैशाची चणचण, जमीनदाराचा जाच, मोरजीतील सिंथिया जगतेय हालाखीचं आयुष्य

तिने सुद्धा वेटर्स व पर्यटकांना अडविण्याचा प्रयत्न केला. या हल्लेखोरांनी माझ्या पायावर आघात केल्याने मला चालता येत नव्हते. आम्ही दारू प्यालो नव्हतो. केवळ पायावरील हल्ल्यामुळे मला त्रास जाणवत होता.

या हल्लेखोरांनी आम्हाला मारण्याच्या धमक्यापण दिल्या असेही जेसनने सांगितले. पोलिसांनी हा व्हिडीओ संपूर्ण पहावा व खरे काय ते जाणून घेऊन मला व मैत्रिणीला न्याय द्यावा, असे जेसनने सांगितले

Porvorim Crime
Goa Police: गोवा पोलिसांची नवी मोहीम! परप्रांतीय भाडेकरूंची तपासणी सुरू, माहिती न दिल्यास...

कायदा हातात घेणारे पर्यटक पाहिजेत काय?

या पत्रकार परिषदेला जेसन फुर्तादो व जेमिमा वाझ यांचे वकील बायरन रॉड्रिग्ज यांनी प्रश्न उपस्थित केला की केरळच्या पर्यटकांना यामध्ये पडण्याची मुळीच गरज नव्हती. आम्हा गोवेकरांना कायदा हातात घेणारे पर्यटक पाहिजेत का?

पोलिसांनी जर आमची तक्रार दाखल करून घेतली नाही किंवा एफआरआय नोंद केला नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई करू, वेळ पडली तर न्यायालयातही जाऊ, असे रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com