Goa Monsoon: तापमानवाढीमुळे ढगफुटी सदृश पाऊस!

Goa Monsoon: हे प्रकार लक्षात घेऊन सरकार, समाज आणि तज्‍ज्ञ यांनी एकत्रित येऊन उपाय योजले पाहिजेत.
Goa Monsoon
Goa Monsoon Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon: जागतिक तापमानामुळे उष्णतेचा दाब वाढत जातो. त्यामुळे बाष्पाचे ढग गतीने वितळतात आणि एकाच ठिकाणी पाऊस कोसळतो. परिणामी आपत्ती कोसळते. हे प्रकार लक्षात घेऊन सरकार, समाज आणि तज्‍ज्ञ यांनी एकत्रित येऊन उपाय योजले पाहिजेत.

सत्तरीसारख्‍या घटना यापुढेही घडणारच हे लक्षात घेऊन पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरणतज्‍ज्ञ तथा भौगोलिक वातावरणाचे अभ्यासक तथा पिसफुल सोसायटीचे सचिव कुमार कलानंद मणी यांनी दै. ‘गोमन्तक’शी वार्तालाप करताना सांगितले.

Goa Monsoon
Goa News: शिर्डीसाठी तिकीट बुकिंगची मागणी वाढली: उल्हास तुयेकर

सत्तरीत जो एकाच ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस पडण्याचे प्रकार घडला आहे आणि घडत आहे, हा वातावरण बदलाचा (क्लायमेट चेंज) परिणाम आहे. सत्तरी, धारबांदोडा आणि सांगे या तिन्ही तालुक्यांत पावसाचे प्रमाण अधिक आहे. कारण या ठिकाणी दाट जंगल आहे. जागतिक तापमानवाढीविषयी आपण मागील काही वर्षांपासून ऐकत आहोत.

तसेच, त्याचा परिणाम वातावरण बदलावर पूर्णपणे झालेला आहे. त्यामुळे आता कुठल्याही क्षेत्रात ढगफुटी होण्याचे प्रकार घडत आहेत. मागील काही काळात मुंबई (Mumbai), चेन्नई, दिल्ली, केरळ अशा ठिकाणी जोरदार आणि काही वेळच पाऊस पडला. त्यामुळे पूर येण्याचे प्रकार घडल्याचे आपणास दिसते असे मणी यांनी सांगितले.

हवामानाचे परिवर्तन होत आहे. सरकार, पर्यावरणीय संस्थांनी आणि समाजाने एकत्रित येऊन जल व्यवस्थापन केले पाहिजे. वातावरण बदलत आहे, हे समजून ते उपाय योजले गेले पाहिजेत. जर हे उपाय योजले गेले नाहीत, तर प्रचंड हानीला सामोरे जावे लागेल.

Goa Monsoon
Goa BJP: दिगंबर कामत मोदींच्या प्रेमात!

सत्तरीतही अशाप्रकारचे उपाय योजले गेले पाहिजेत. कारण एकाच ठिकाणी जेव्हा पाऊस काही वेळात मोठ्या प्रमाणात म्हणजे ढगफुटीसारखा पडतो, त्यामागे तापमान बदलाचा परिणाम असल्याचे स्पष्ट आहे, असे मणी म्‍हणाले.

पावसाचे राज्यातील कॅलेंडर (दिनदर्शिका) बदलले आहे. यापूर्वी मॉन्सून जून महिन्याच्या सहा-सात तारखेला दाखल व्हायचा, पुढे पावसाळा सप्टेंबरपर्यंत राहायचा, आता तो पाऊस ऑक्टोबरपर्यंत पडत आहे. उष्णतेच्या दाबामुळे जलयुक्त ढग कोसळण्याचे प्रकार केवळ एकाच ठिकाणी नाही तर ते आता कोठेही होऊ शकतात, हे मागील घटनांवरून दिसून येते, असेही मणी यांनी सांगितले.

कुमार कलानंद मणी, भौगोलिक वातावरणाचे अभ्यासक-

ढगफुटी होणे आणि पूर येणे, आपत्ती ओढवणे अशा घटना घडतच राहणार आहेत. त्याचा दोष वातावरण बदलाला देत असलो तरी आपण चुकीच्या मार्गाने विकास साधत आहोत हे कोणीच लक्षात घेत नाही. या सर्वांचा विचार सरकार, पर्यावरणप्रेमी आणि विशेषतः जनतेने करायला हवा.

सत्तरीत ज्याप्रकारे मागील वर्षी आणि आता पाऊस पडला, त्यावरून त्याठिकाणी भविष्याचा विचार करून उपाय योजणे आवश्‍यक आहे. हे उपाय योजले नाहीत तर आपत्ती ओढावण्याची भीतीही आहे, हे समजून घ्यावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com