Gynecologist Dr. Jayant Kamat: रात्री दिली सेवा, पहाटे झोपेतच मृत्यू! फोंड्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयंत कामतांसोबत काय घडलं?

Dr. Jayant Kamat Sudden Demise: फोंड्यातील (Ponda) प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या कामत यांच्या अचानक जाण्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Gynecologist Dr. Jayant Kamat: रात्री दिली सेवा, पहाटे झोपेतच मृत्यू! फोंड्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयंत कामतांसोबत काय घडलं?
Gynecologist Dr. Jayant KamatDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: मंगळवारी रात्री उशिरापर्यंत इस्पितळात रुग्णांची तपासणी केल्यानंतर घरी परतलेल्या डॉ. जयंत कामत (७३) यांचे बुधवारी पहाटे (ता.२८) झोपेत आकस्मिक निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

फोंड्यातील (Ponda) प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या कामत यांच्या अचानक जाण्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी फोंड्यातील मुक्तिधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्‍चात पत्नी तसेच पुत्र डॉ. अभिजीत व एक कन्या असा परिवार आहे.

Gynecologist Dr. Jayant Kamat: रात्री दिली सेवा, पहाटे झोपेतच मृत्यू! फोंड्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयंत कामतांसोबत काय घडलं?
Allu Arjun at IFFI 2024 : इफ्फीच्या समारोप समारंभाला अल्लू अर्जुन-रश्मिका लावणार हजेरी; बहुचर्चित ‘पुष्पा-2’चे आज प्रमोशन

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून (Goa Medical College) पदवी घेतल्यानंतर डॉ. जयंत कामत यांनी शांतीनगर-फोंडा येथे कामत नर्सिंग होम सुरू केले होते. अनेक रुग्णांवर त्यांंनी यशस्वी उपचार केल्यामुळे ते फोंडा व इतर भागात परिचित होते. गोव्याबरोबरच कर्नाटक, महाराष्ट्रातून लोक उपचारासाठी त्यांच्याकडे येत होते. त्यांनी वंध्यत्वाची समस्या असलेल्या दाम्पत्यांवर योग्य उपचार केले, त्याचा लाभ अनेकांना झाला. पेशाबरोबरच माणुसकीही जपणारा वैद्य म्हणून त्यांची ओळख होती.

कोविडकाळात २४ तास कार्यरत

वयाची सत्तरी गाठल्यानंतरही कोविड काळात २४ तास सेवा देणाऱ्या डॉक्टरांपैकी एक असे डॉ. कामत होते. या काळात त्यांनी नर्सिंग होम बंद ठेवले नव्हते. रुग्णांच्या विनंतीवरून त्यांनी सलग सेवा दिली. एखाद्या तरुणाला लाजवेल इतकी चपळाई त्यांच्यामध्ये होती. ‘रुग्णसेवा प्रथम’ या तत्त्वानुसार ते काम करीत राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com