Engineer's Day: चांद्रयानासाठीची उपकरणे गोव्यातून पाठवली गेली याचाच अर्थ 'गोमंतकीय अभियांत्रिकी क्षेत्रात सक्षम'

डॉ. पूर्णानंद सावईकर: फोंड्यात अभियंतादिन उत्साहात
Engineer's Day celebrate in Ponda
Engineer's Day celebrate in Ponda Dainik Gomantak
Published on
Updated on

Engineer's Day देशाच्या इतर राज्यांचा विचार केल्यास आपले गोवा राज्य लहान असले, तरी गोमंतकीय कुठेही कमी पडलेले नाहीत. गोव्यातील साधनसुविधा प्रकल्पांच्या निर्मितीबरोबरच चांद्रयानासाठी जी उपकरणे आवश्‍यक होती, त्यातील काही उपकरणे गोव्यातून उपलब्ध करण्यात आली.

त्यामुळे गोवा आणि गोमंतकीय अभियांत्रिकी क्षेत्रात सर्वचदृष्ट्या सक्षम असल्याचे सिद्ध होते, असे उद्‍गार फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पूर्णानंद सावईकर यांनी काढले.

फोंड्यातील थ्रिफ्ट सभागृहात शुक्रवारी अभियंतादिन साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच भारताचे आद्य अभियंता एम. विश्‍वेश्‍वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पूर्णानंद सावईकर बोलत होते. या कार्यक्रमात निवृत्त सरकारी अभियंता दिलीप ढवळीकर, विजय म्हार्दोळकर, विजयकुमार वेरेकर यांचा पूर्णानंद सावईकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर पूर्णानंद सावईकर यांच्यासमवेत तिन्ही सत्कारमूर्ती तसेच अभियंतादिन कार्यक्रमाचे आयोजक यशवंत मापारी, लक्ष्मीकांत नाईक, शशिकांत देसाई, दयानंद नाडकर्णी, साधना बांदेकर, आनंद वाघुर्मेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन दीपा मिरिंगकर यांनी केले. दिती बोरकर यांनी पूर्णानंद सावईकर यांचा परिचय करून दिला. आनंद वाघुर्मेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर काशिनाथ सराफ यांनी आभार मानले. त्यानंतर ‘रिटेनिंग स्ट्रक्चर्स’ या विषयावर डॉ. पूर्णानंद सावईकर यांनी अधिक माहिती दिली.

‘अभियंत्यांनी गोव्याच्या विकासाला हातभार लावावा’

पूर्णानंद सावईकर म्हणाले की, अभियंतादिन साजरा करण्याची आज खरी गरज आहे. अशा कार्यक्रमातून अभियंत्यांकडून विचारांचे आदानप्रदान व्हायला हवे, नवनवीन विचारांची देवाणघेवाण व्हायला हवी.

अशाप्रकारच्या कार्यक्रमातून सर्व अभियंत्यांनी एकत्रित येऊन आपले अस्तित्व सिद्ध करावे. अभियंत्यांनी संघटीत होऊन गोव्याच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन सावईकर यांनी केले.

Engineer's Day celebrate in Ponda
Goa Police: सावधान! तोतया पोलीस फोन करुन उकळताहेत पैसे, खऱ्या पोलिसांचे गोवेकरांना आवाहन

‘जलप्रकल्पात काम हे माझे भाग्यच’

सत्कारमूर्ती दिलीप ढवळीकर यांनी अभियंतादिनाच्या सर्वांना शुभेच्छा देताना देशाच्या जडणघडणीत अभियंता उपयुक्त ठरला असल्याचे नमूद केले.

देशाचे महान अभियंता विश्‍वेश्‍वरय्या यांच्या प्रगल्भतेतून अनेक मोठे प्रकल्प साकारले, त्यातीलच एक ओपा जल प्रकल्प असून या प्रकल्पात काम करण्याची संधी आपल्याला लाभली, अनेक अनुभव मिळाले, नवीन शिकायला मिळाले, असे सांगितले.

Engineer's Day celebrate in Ponda
Ganesh Chaturthi: वास्को- डिचोलीत माटोळी बाजार फुलले, सजावट साहित्य खरेदीसाठी गर्दी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com