Illegal Dumping In Dhavali: ढवळीतील भंगारअड्डे हटवण्याचा मार्ग मोकळा!

कवळे पंचायतीला मोठा दिलासा ः सद्यस्थितीत परिसरातील सात अड्ड्यांवर फिरणार बुलडोझर
Illegal Dumping
Illegal DumpingDainik Gomantak

Illegal Dumping In Dhavali कवळे पंचायतक्षेत्रातील ढवळी येथे बेकायदेशीररीत्या कार्यरत असलेले सात भंगारअड्डे त्वरित हटवण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने कवळे पंचायतीला मोठा दिलासा मिळाला आहे.

या आदेशामुळे गेला बराच काळ हे भंगारअड्डे हटवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या कवळे पंचायतीला हे बेकायदा भंगारअड्डे हटवता येणार असून येत्या काही दिवसांतच ढवळी स्वच्छ सुंदर होईल, असे पंचायत मंडळाने म्हटले आहे.

ढवळी भागात गेली अनेक वर्षे बेकायदा भंगारअड्डे कार्यरत असून कवळे पंचायतीच्या ग्रामसभेत हा विषय कायम चर्चेला येत होता.

Illegal Dumping
RTI Workshop In Borda Goa: सुशासनासाठी माहितीचा अधिकार- एगना क्लिटस

या बेकायदा भंगारअड्ड्यांमुळे परिसरातीला धोका निर्माण होत असल्याने कवळे पंचायतीचे तत्कालीन सरपंच राजेश कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील पंचमंडळाने सातत्याने नोटिसा बजावल्या होत्या, पण प्रकरण शेवटी न्यायालयात गेल्यामुळे हा वाद तसाच धुमसत राहिला होता.

प्रत्येकवेळी पंचायतीने कारवाई करायला जावी तर न्यायालयातून स्थगितीचा आदेश यायचा. काही भंगारअड्ड्यांची प्रकरणे उपजिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत, त्यावरही अपेक्षित निर्णय होईल, अशी आशा कवळे पंचायत मंडळाने व्यक्त केली आहे.

कवळे पंचायतक्षेत्रात अनेक भंगारअड्डे कार्यरत असून त्यांच्याकडे कोणतीच कायदेशीर कागदपत्रे नाहीत. पंचायतीच्या तक्रारीनुसार सरकारी यंत्रणेने वेळोवेळी या भंगारअड्ड्यांची तपासणीही केली होती, आणि आपला अहवाल सादर केला होता, पण अपेक्षित निर्णय होत नसल्याने ही कारवाई लांबली होती.

Illegal Dumping
Mapusa Crime: घरफोडी प्रकरणातील संशयिताकडून सात लाखांचे 132 ग्रॅम दागिने जप्त

मात्र आता न्यायालयाने भंगारअड्डे हटवण्यासाठी मोकळीक दिल्याने पंचायत यासंबंधी लगेच कारवाई करील, असे सरपंच मनुजा नाईक तसेच उपसरपंच सुशांत कपिलेश्‍वरकर व इतर पंचसदस्यांनी सांगितले.

दरम्यान, या बेकायदेशीर भंगारअड्ड्यांमध्ये कोणत्याच प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्याने तसेच कामगारांच्या बेकायदेशीर निवासामुळे सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला होता.

काही भंगारअड्ड्यात तर सकाळी टाकाऊ साहित्य जाळले जात असल्याने त्याचा त्रास तेथील लोकवस्तीला होत असल्याने कवळे ग्रामसभेत हा विषय चर्चेला येत होता.

पण आता कारवाईचा मार्ग मोकळा झाल्याने संभाव्य धोका टळल्याचे माजी सरपंच राजेश कवळेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com